भाई गम्मत नसती,
२१-२२ वर्षाच पोरगं आहे ते, राज्यभर ओळखतात लोकं त्याला...
राज्यबाहेर सत्कार होतात त्याचे, कधी, कुठेही, कोणीही, कोणत्याही वेळेला फोन करून 'रक्त' पाहिजे पेशंट आहे म्हंटल की Praful तयार असतो, कुठे विचारतो आणि ठीक आहे ना होऊन जाईल' इतकंच बोलतो.
ओळख नाही पाळख नाही, कोण कुठला, कुठल्या पक्षाचा काहीही तो विचारत नाही.
लोकंही खुप हुशार, गरज असली की त्याला फोन करतात आपली-आपल्या नातलगाची गरज भागली की विसरून जातात, प्रफुलची अशी काही वेगळी अपेक्षा नसते हो त्यांच्याकडून, दुसऱ्या कोणाला परत रक्ताची गरज भासली तर या जुन्या लोकांनी पुढे यावं बसं इतक मात्र त्याला वाटतं, का वाटू नये? आणि शेवटी रक्त क़ाय रॉ-मटेरिअल मधून बनत नाही त्याला मानवी शरीर लागतं फक्त !!
त्याची ही तळमळ त्याला एखादं पद-पुरस्कार मिळावं म्हणून नाही आहे, आपण कोणाचातरी जीव वाचवू शकतो या भावनेमधुन आहे, ही भावना त्याने कविता रूपी ओवींतून लिहून दाखवली आहे, जिजाऊजयंतीला प्रफुल भेटलेला, दादा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कविता छापायला हो म्हंटल आता ते नाही म्हनत आहे हे तो सांगत होता, शेवटी विघ्न येतातचं कारण आपलेचं आपल्या पायांत पाय घालायला, एखादी चांगली गोष्ट होत असेल तर 'ती' थांबवायला त्यांन एक वेगळा आनंद मिळतो की क़ाय? देव जाने...
पण आज प्रफुलच्या कार्याची दखल महामहिम राज्यपाल महोदयांनी घेतली आहे , त्याच्या कार्याची पोहोचपावती आज सर्व दैनिकांमधे आहे, शेवटी सूर्य झाकायचा कसा? तो झाकता येत नाही हेच खरं...
गरजेच्या वेळी आपण कोणा ना कोणाला रक्त मागत असतो तसंच इतर कोणाला लागलं तर आपण पुढाकार घेऊन व्यवस्था केली पाहिजे इतकं केलं तरी प्रफुलची ही तळमळ पूर्णत्वास गेली असं समजूया ...
भावा तुला पुढल्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐
शेवटी क़ाय, 'नफरतों के इस दौर में जनाब हम चल पड़े है जिंदगी बचाने, सुना है उम्मीद है तो सफलता मिल ही जाती है'
परेश बुटे, यवतमाळ✌️
No comments:
Post a Comment