महाराष्ट्राचा महानायक श्री. वसंतराव नाईक....
काळ्या मातीचे हिरवे स्वप्न साकार करणाऱ्या भुमिपुत्र म्हणजे श्री वसंतराव नाईक. शेती आणि शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय त्यांच बालपण खेड्यातलं असल्याने मातीचा त्यांच्याशी बिकटचा संबंध आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो अन्नदाता आहे. तो जगला, पाहिजे, अशा पोटतिडकीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर मिळवली. धरेच्या कणाकणातून समृद्धी फुलवली. त्यामुळे त्यांच्या कर्तुत्वाचा आलेख उंचावला.
सलग ११ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले श्री. वसंतराव नाईक हे एक प्रतिभावंत, कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून संपुर्ण महाराष्ट्र त्यांना जाणतो. त्यांच्या कार्याची छाप आजही जिल्ह्यातील तरुणांच्या मुखावर आहे. त्यांनी सुधारणेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. आणि आत्मनिर्भर, स्वयंपूर्णता या शब्दांचा खरा अर्थ सर्वांना दाखविला.
१} पुसद - तालुका यवतमाळचा
महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांपैकी एक असलेला तालुका "पुसद" आहे. जिल्ह्यातील पुस नदीवर वसलेले शहर, अशी पुसदची ख्याती सर्वदूर आहे. पुसदला वैविध्यपूर्ण जंगलाबरोबरच, सुंदर अशी भौगोलिक रचना लाभलेली आहे. चोहोबाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं पुसद नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आहे. पुसदचा इतिहास गौरवशाली आहे. ज्यांच्यातून तरुणांना भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी घेतल्या गेलेल्या कष्टाची, मेहनतीची जाणीव होते. आणि स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आपुलकी निर्माण होते. जिल्ह्यात सर्वप्रथम येथून जवळच असलेल्या बेळगव्हानच्या जंगलात लोकमान्य टिळकांनी सत्याग्रह केला होता.
पुसदला विद्येच माहेरघर असेही म्हणतात. कारण जिल्ह्यातील पहिल्या इंजिनिअर कॉलेज ची स्थापना होण्याचा मान पुसदला मिळाला होता. पुसद हे शहर आकारमानाने बरेच मोठे आहे. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय असा सर्वांगीण विकास झालेला आपल्याला पहायला मिळते. येथे ही शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. अशा समृद्ध, संपन्न वारसा लाभलेल्या पुसदला श्री वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. शेती-मातीशी त्यांचा असलेला सलोखा आपल्याला यांच्या स्वभावाची प्रचिती देईल की. शेतकऱ्यांना ते आपुलकीने मानत. पुसदची राजकीय व्याप्ती फार मोठी होती. कारण ज्या काळात देशाला स्वातंत्र्याची वाट होती. वातावरण अगदीच सत्याग्रही झालं होतं.
त्या काळात पुसद मधून नेतृत्व करणारी माणसे तिथे अस्तित्वात होती. मनात मातूभूमीविषयी प्रेम असणारा, सुधारणेचा पाया असणारा, महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करणारा रस्ताही पुसदमधून गेला आहे. ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. पुसद शहरातून दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. त्यामध्ये श्री. वसंतराव नाईक नंतर सुधाकरराव नाईकांच नाव पुढे येते. ज्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराच काळ जनकल्याणासाठी घालवला.
श्री वसंतराव नाईक हे सलग ११ वर्षाचा प्रदिर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेले महान व्यक्तिमत्त्व आहे. ज्यांनी यवतमाळ जिल्ह्याचा नाव लौकिक संपूर्ण भारतात केला. आणि महाराष्ट्राला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवला. शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून लाभलेला वसंतराव नाईक हे कृषी - सुधारणेचा पाया घालणारे भूमिपुत्र होते. घाटातून मार्ग काढत जाणारा रस्ता वळण घेत पुसदला पोहोचतो त्या पुसदच श्री वसंतराव नाईक हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. पुसदच्या मातीतला हिरा आहे. ज्यांच्यावर पैलू पाडले गेले. आणि त्यांच्या सुंदर - सुलेख, रेखीव आयुष्याचा प्रभाव सर्वांवर पडला नि फक्त पुसद व आजूबाजूचा प्रदेशच नाही तर अख्या महाराष्ट्र त्यांच्या छायेखाली चकाकून निघाला.
- प्रफुल्ल भोयर ( यवतमाळ )
७०५७५८६४६८
क्रमशः
२ } पवित्रभूमी
No comments:
Post a Comment