युवकांनी व्यायामाचे महत्व जाणणे गरजेचे
◆ नेहरू युवा केंद्राचा कार्यक्रम झाला यशस्वी
स्पर्धेच्या युगात अनेकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कमी वयात शारीरिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यातून गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. व्यायामा अभावी होणारे दुष्परीणाम रोखण्यासाठी दैनंदिन जीवनात व्यायाम करणे गरजेचे आहे. म्हणून युवकांना व्यायामाचा संदेश देण्यासाठी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आजादि का अमृत महोत्सव च्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार द्वारे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम सर आणि नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे सर यांच्या मार्गदर्शनात झरी तालुक्यातील मुकुटबन येथे फिट फॉर रन 2.0 चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम नेहरू युवा केंद्राची राष्ट्रीय स्वयंसेविका प्रविणा भोयर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.
कार्यक्रमात वनविभागाचे कुणाल सावरकर यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी रक्तविर बहुउद्देशीय संस्थचे विशेष सहकार्य मिळाले. गावातील अनेक युवक युवतींनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. फिट फॉर रन साठी कुणाल सावरकर आकाश याटकर्लेवार, वैभव गोर्लावार, प्रफुल भोयर, यांनी परिश्रम घेतले. फिट फॉर रन ची व्यायामशाळेतून सुरवात झाली. त्याअगोदर फिट फॉर रन शपथ घेण्यात आली. फिट इंडिया साठी प्रत्येक घरात व्यायाम व योगाचा संदेश पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गावागावातील असंख्य नागरिक महिला युवक युवती उपस्थित होते.
No comments:
Post a Comment