16 December 2022

"विश्वात्मक औदार्य" शब्दयात्रा प्रकाशन प्रदर्शनीत उपलब्ध...

 "विश्वात्मक औदार्य" शब्दयात्रा प्रकाशन प्रदर्शनीत उपलब्ध...



🌱✨🌺

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग

ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या यवतमाळ ग्रंथोत्सव 2022 मधील प्रदर्शनीत प्रफुल्ल भोयर या प्रसिद्ध लेखकाचे आपल्या सर्वांच्या कार्याला समर्पित "विश्वात्मक औदार्य" हे पुस्तक अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथे आज सुरू असलेल्या कार्यक्रमात उपलब्ध आहे.


◆ शब्दयात्रा पुस्तकालय

स्थळ :- अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ


प्रफुल भोयर - 7057586468






06 December 2022

चिकणी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...

         ◆ रक्तदान शिबिर


       महापरिनिर्वाण दिन व श्री दत्त जयंती च्या औचित्यावर जनहित युवा बहुउद्देशीय संस्था चिकणी यांचे विद्यमाने दिनांक 6 डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा चिकणी येथील प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

        यावेळी शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. रक्तसंकलनासाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी होती. जिल्ह्यातील रक्ताची वाढती मागणी आणि पडणारा तुटवडा पाहता रक्तदाते वाढवणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन महापरिनिर्वाण दिन तथा दत्तजयंती निमित्त शिबीर आयोजन केले होते.

        शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुनील आडे, रक्तमित्र प्रफुल भोयर, ऋषिकेश टाटर, सुरेश राठोड, राम जाधव, सचिन राठोड, सागर वलके,आशुतोष पाढेन, अजय चव्हाण, दत्ता गजरे, कुणाल राठोड, संचित कुत्तरमारे, लेखन राठोड, करण ठाकरे, यांनी मेहनत घेतली.























04 December 2022

यवतमाळ जिल्हा साहित्य मंच द्वारा आयोजित साहित्य संमेलनात कविता सादरीकरण केल्याबद्दल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मला गौरविण्यात आले...



सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मला देताना अवधुतवाडी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक केदारे सर...

                                           ✨🌺🌱

     यवतमाळ जिल्हा साहित्य मंच द्वारा आयोजित साहित्य संमेलनात कविता सादरीकरण केल्याबद्दल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मला गौरविण्यात आले...

😊🙏🏻

साहित्याच्या मांडीयाळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व मा. शिक्षण मंत्री श्री पुरके साहेब यांच्या समवेत...
✨🌺



18 November 2022

प्रफुल भोयर यांनी जपली सामाजिक जाणिव....

 प्रफुल भोयर यांनी जपली सामाजिक जाणिव

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस केला साजरा



             वाढदिवसाचा आनंद आपण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहत असतो. वाढदिवस म्हटले की आपल्या परीने साजरा करण्याची परंपराच जणू. पण काही मात्र सामाजिक जाणिवा कायम आपल्यात बाळगतात. प्रफुल भोयर हा असाच एक युवक. ज्याने सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस श्री. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग विद्यालय यवतमाळ येथे साजरा केला.

          सुहृदयी प्रफुल भोयर यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत दिव्यांगांना आपल्या आनंदात सहभागी करून वाढदिवस साजरा केला. 

       प्रफुल यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग विद्यालय यवतमाळ येथे नगरसेवक श्री. नितीन मिर्झापुरे, श्री. दिपक धात्रक, मोनेश्वर खंडरे, सुनील आडे, प्रफुल पांगुळ, नितीश कुंटावार, ऋषिकेश टाटर उपस्थित होते. 

     यावेळी वसतीगृह अधीक्षक श्री. सीताराम राठोड, कु. वर्षा परिहार, वैभव घोलप तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रफुल यांनी विद्यालयाच्या कार्यालयाला घड्याळ भेट दिली. मुलांना खाऊ वाटप करुन प्रफुल यांनी सर्वांचे आभार मानून आशीर्वाद घेतला. याप्रसंगी या छोट्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रफुल यांच्या या सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










02 November 2022

रक्तदान साक्षात जीवनदान....!!

 पेशंटचे नाव:- भाग्यश्री सरकटे O+ve

रक्तदाते रक्तविर :- पंकज धवणे O+ve 

@SVNGMCBlood Bank Yavatmal



15 October 2022

प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा....

 प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा...

रक्तविर ठरतोय जीवनरक्षक



यवतमाळ: रक्तदाता आकाश जिवतोडे यांनी समाजाला रक्तदानाचा संदेश देत एका रुग्णाला जीवनदान दिले. कारण जीवनदान यासाठी की त्यांनी रक्तदान करून प्राण वाचविले आहे.

          ना कुठला उत्सव ना कुठले औचित्य तरीही रक्तदाता यांनी स्वैच्छिक रक्तदान करून रुग्णाला सहानुभूतीपूर्वक दिलासा दिला आहे.

          जिल्ह्यात सर्वत्र रक्तविर बहुद्देशीय संस्थेची रक्तदान जनजागृती मोहीम आपली मुळे खोलवर रोवताना दिसत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अनेक नवीन रक्तदात्यांची रक्तदानाची इच्छा पूर्णत्वास येत आहे. 

          जनजागृतीला प्रतिसाद म्हणून रक्तदाते आकाश यांनी अपघातग्रस्त मधुकर डांगे यांच्यासाठी श्री वसंतराव नाईक शासकिय रक्तपेढी तेथे रक्तदान करून सर्वांना रक्तदानाचा संदेश दिला. या यशस्वी रक्तदानासाठी रक्तविरांना मोठे परिश्रम घ्यावे लागले. यावेळी आकाश जीवतोडे, प्रफुल भोयर तसेच मित्रमंडळ यांचे मोलाचे योगदान लाभले. यांचे रुग्णनातेवाईकांनी आभार मानले.



10 October 2022

बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर...

 🧑‍⚕️🧑‍⚕️💉💊🩸🩺🧑‍⚕️🧑‍⚕️

मोफत आरोग्य शिबिर

          सर्व नोंदणीकृत इमारत व बांधकाम कामगारांना कळविण्यात आनंद होत आहे, की आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त नोंदणी कृत इमारत व  बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


        रक्त तपासणी चाचण्या अगदी पुर्णपणे मोफत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. याच बरोबर BP, शुगर,  कान व डोळ्यांची कमजोरी तपासणी  पुर्ण पणे निःशुल्क करण्यात येणार आहे.

सर्व नोंदणी कृत नूतनीकरण झालेले इमारत व  बांधकाम कामगारांना विनंती आपण सदर शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा.

 धन्यवाद...!

यासाठी सोबत 

१)आधार कार्ड

२)बांधकाम कामगार नूतनीकरण नोंदणी पावती किंवा बांधकाम कामगार कार्ड

ज्या कामगारांची पावती किंवा कार्ड रिनिवल केले आहे त्यांनी आपल्या परिवारातील 4 व्यक्तींची (10 वर्षावरील 2 मुल आणि पती -पत्नी)















































कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...