18 November 2022

प्रफुल भोयर यांनी जपली सामाजिक जाणिव....

 प्रफुल भोयर यांनी जपली सामाजिक जाणिव

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस केला साजरा



             वाढदिवसाचा आनंद आपण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहत असतो. वाढदिवस म्हटले की आपल्या परीने साजरा करण्याची परंपराच जणू. पण काही मात्र सामाजिक जाणिवा कायम आपल्यात बाळगतात. प्रफुल भोयर हा असाच एक युवक. ज्याने सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस श्री. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग विद्यालय यवतमाळ येथे साजरा केला.

          सुहृदयी प्रफुल भोयर यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत दिव्यांगांना आपल्या आनंदात सहभागी करून वाढदिवस साजरा केला. 

       प्रफुल यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग विद्यालय यवतमाळ येथे नगरसेवक श्री. नितीन मिर्झापुरे, श्री. दिपक धात्रक, मोनेश्वर खंडरे, सुनील आडे, प्रफुल पांगुळ, नितीश कुंटावार, ऋषिकेश टाटर उपस्थित होते. 

     यावेळी वसतीगृह अधीक्षक श्री. सीताराम राठोड, कु. वर्षा परिहार, वैभव घोलप तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रफुल यांनी विद्यालयाच्या कार्यालयाला घड्याळ भेट दिली. मुलांना खाऊ वाटप करुन प्रफुल यांनी सर्वांचे आभार मानून आशीर्वाद घेतला. याप्रसंगी या छोट्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रफुल यांच्या या सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










No comments:

Post a Comment

मराठी भाषेची संघर्ष ज्योत मनात पेटत ठेवा - डॉ. किशोर बुटले

◆ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लाॅ मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा यवतमाळ – स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा लॉ कॉले...