30 September 2021


 भाई गम्मत नसती, 
२१-२२ वर्षाच पोरगं आहे ते, राज्यभर ओळखतात लोकं त्याला...
राज्यबाहेर सत्कार होतात त्याचे, कधी, कुठेही, कोणीही, कोणत्याही वेळेला फोन करून 'रक्त' पाहिजे पेशंट आहे म्हंटल की Praful तयार असतो, कुठे विचारतो आणि ठीक आहे ना होऊन जाईल' इतकंच बोलतो.
ओळख नाही पाळख नाही, कोण कुठला, कुठल्या पक्षाचा काहीही तो विचारत नाही.
लोकंही खुप हुशार, गरज असली की त्याला फोन करतात आपली-आपल्या नातलगाची गरज भागली की विसरून जातात, प्रफुलची अशी काही वेगळी अपेक्षा नसते हो त्यांच्याकडून, दुसऱ्या कोणाला परत रक्ताची गरज भासली तर या जुन्या लोकांनी पुढे यावं बसं इतक मात्र त्याला वाटतं, का वाटू नये? आणि शेवटी रक्त क़ाय रॉ-मटेरिअल मधून बनत नाही त्याला मानवी शरीर लागतं फक्त !!
त्याची ही तळमळ त्याला एखादं पद-पुरस्कार मिळावं म्हणून नाही आहे, आपण कोणाचातरी जीव वाचवू शकतो या भावनेमधुन आहे, ही भावना त्याने कविता रूपी ओवींतून लिहून दाखवली आहे, जिजाऊजयंतीला प्रफुल भेटलेला, दादा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कविता छापायला हो म्हंटल आता ते नाही म्हनत आहे हे तो सांगत होता, शेवटी विघ्न येतातचं  कारण आपलेचं आपल्या पायांत पाय घालायला, एखादी चांगली गोष्ट होत असेल तर 'ती' थांबवायला त्यांन एक वेगळा आनंद मिळतो की क़ाय? देव जाने...
पण आज प्रफुलच्या कार्याची दखल महामहिम राज्यपाल महोदयांनी घेतली आहे , त्याच्या कार्याची पोहोचपावती आज सर्व दैनिकांमधे आहे, शेवटी सूर्य झाकायचा कसा? तो झाकता येत नाही हेच खरं...
 गरजेच्या वेळी आपण कोणा ना कोणाला रक्त मागत असतो  तसंच इतर कोणाला लागलं तर आपण पुढाकार घेऊन व्यवस्था केली पाहिजे इतकं केलं तरी प्रफुलची ही तळमळ पूर्णत्वास गेली असं समजूया ...
भावा तुला पुढल्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐
शेवटी क़ाय, 'नफरतों के इस दौर में जनाब हम चल पड़े है जिंदगी बचाने, सुना है उम्मीद है तो सफलता मिल ही जाती है'

परेश बुटे, यवतमाळ✌️




"विश्वात्मक औदार्य- रक्तपेढी एक वरदान" चे राज्यपालांकडून कौतुक

 



यवतमाळ शासकीय रक्तपेढीला राज्यपालांच्या शुभेच्छा https://www.tarunbharat.net/Encyc/2021/9/30/Governor-s-wishes-to-Yavatmal-Government-Blood-Bank.html


https://deshonnati.digitaledition.in/c/63466706



साजरा करु उत्सव रक्तदानाचा....

                 साजरा करु उत्सव रक्तदानाचा        

              १ ऑक्टोबर

               ◆ स्वैच्छिक रक्तदान दिवस



     भारतीय समाजात सण उत्सव साजरे करण्याचा प्रघात पूर्वापार चालत आहे. आपली संस्कृती अबाधित राखण्यासाठी सण- उत्सव साजरे करणे खुप महत्त्वपूर्ण ठरते. त्या काळात निराशेच्या दलदलीतून बाहेर येत वेगळाच उत्साह मनात भरतो. तो उत्साह आपल्या जगण्याचा आनंद द्विगुणित करीत असतो. वेगवेगळ्या भागात उत्सव साजरे करण्यात कमालीची विविधता दिसून येते. प्रत्येक भागात सण साजरे करण्याची तऱ्हाही निराळीच. 

         आज 1 ऑक्टोबरला स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. रक्तदान श्रेष्ठदान या म्हणीप्रमाणे मानवी जीवनात रक्त हा विशेष महत्वपूर्ण घटक आहे. मानवाला जिवंत राहण्यासाठी शरीराची रक्ताची पातळी योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्या शरीरात जसे थँलेसिमीया, सिकलसेल, ऍनिमिया सारख्या रुग्णांना जिवंत राहण्यासाठी नियमित रक्ताची गरज असते. अश्यांना जिवंत ठेवण्यासाठी सुदृढ युवकांनी नियमित स्वैच्छिक रक्तदान करणे महत्वाचे आहे. 

          मानवी शरीरात रक्ताच्या कमतरतेसाठी विविध कारणे असू शकतात. मानवाला विविध कारणासाठी रक्ताची आकस्मित गरज भासू शकते. ती तात्काळ पूर्ण व्हावी म्हणजे यासाठी रक्तदान करणारा दाता हवा.  सुदृढ शरीराचा व्यक्ती मानसिकतेने रक्तदानास तयार नसेल तर आकस्मित येणाऱ्या रक्त पुरवण्याच्या समस्येवर तोडगा काढणे कठीण जाते. पण काहीच तरुण लोक सुदृढ शरीरयष्टी सोबत मनाने रक्तदानास तयार असते. अश्यांमुळे कोणाला तरी जीवनदान मिळेल हे निश्चित आहे.

      आजच्या घडीला जीवनमानाच्या बदलामुळे अनेक रुग्णांना तातडीची गरज भासते. अँनिमिया, थँलिसीमिया, सिकलसेल या आजाराच्या रुग्णाला नियमित रक्ताची गरज असते. बाळंतपणासाठी आलेल्या मातांना त्या काळात रक्ताची गरज भासु शकते. मोठमोठ्या शस्त्रक्रिया करताना वा अपघात ग्रस्तांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. अश्या कठीण वेळात रक्तदाता बनुन जीव वाचविण्यास मदत करणारा नक्कीच श्रेष्ठ ठरतो. म्हणूनच तर म्हंटले आहे, "रक्तदानासारखे श्रेष्ठदान" कुठले असू शकते. 

      भविष्यातही एखाद्याला रक्ताची तातडीची गरज असेल, सुदृढ रक्तदानास पात्र असणाऱ्यांची संख्याही अगणित असेल पण मनाने तो रक्तदानाने तयार नसेल तर त्यास आपण सामाजिक बांधिलकी जपणारा तरुण असे म्हणू शकेल काय ?

     समाजात राहताना इतरांशी होणारा व्यवहार हा सौहार्दपूर्ण, आपुलकीचा, सामाजिक बांधिलकीचा असणे फार गरजेचे आहे. 


आनंदाचे क्षण कमी

दुःखची आभाळाएवढे ।

जीवन त्याचेच नाव ना

अनुभव सागरा एवढे ।।


      सामाजिक भान जपत केलेल्या जीवनाचा प्रवास आपणास आलेल्या अनुभवातून शिकण्याची संधी देते. चुका सुधारण्यासाठी वाट दाखवते. म्हणून मानवतेसाठी रक्तदान करणे हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणून पाहणे गरजेचे आहे. हा आपल्या व रुग्ण जिवाच्या कल्याणाचा निर्णय ठरु शकतो.

       १ ऑक्टोबरला साजरा होणारा स्वैच्छिक रक्तदान दिन हा एक सामाजिक उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे. घराघरात एक तरी रक्तदाता तयार झाला पाहिजे. रक्तदानासाठी युवकांनी मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. रक्तदानाचं महत्त्व जाणुन स्वयंप्रेरणेने रक्तदानास पुढे येणे गरजेचे आहे. यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल आणि जीवनदान मिळेल. पर्यायाने आपल्याला आत्मिक समाधान मिळेल. 

        "दान करु रक्ताचे

        ऋण फेडू समाजाचे"


शब्दांकन:- प्रफुल भोयर 

              यवतमाळ

        ७०५७५८६४६८



25 September 2021

महाराष्ट्राचा महानायक श्री. वसंतराव नाईक ✍️ - प्रफुल्ल भोयर

 महाराष्ट्राचा महानायक श्री. वसंतराव नाईक....

       काळ्या मातीचे हिरवे स्वप्न साकार करणाऱ्या भुमिपुत्र म्हणजे श्री वसंतराव नाईक. शेती आणि शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय त्यांच बालपण खेड्यातलं असल्याने मातीचा त्यांच्याशी बिकटचा संबंध आहे.

      शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो अन्नदाता आहे. तो जगला, पाहिजे, अशा पोटतिडकीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर मिळवली. धरेच्या कणाकणातून समृद्धी फुलवली. त्यामुळे त्यांच्या कर्तुत्वाचा आलेख उंचावला.

      सलग ११ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले श्री. वसंतराव नाईक हे एक प्रतिभावंत, कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून संपुर्ण महाराष्ट्र त्यांना जाणतो. त्यांच्या कार्याची छाप आजही जिल्ह्यातील तरुणांच्या मुखावर आहे. त्यांनी सुधारणेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. आणि आत्मनिर्भर, स्वयंपूर्णता या शब्दांचा खरा अर्थ सर्वांना दाखविला.


१} पुसद - तालुका यवतमाळचा

       महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांपैकी एक असलेला तालुका "पुसद" आहे. जिल्ह्यातील पुस नदीवर वसलेले शहर, अशी पुसदची ख्याती सर्वदूर आहे. पुसदला वैविध्यपूर्ण जंगलाबरोबरच, सुंदर अशी भौगोलिक रचना लाभलेली आहे. चोहोबाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं पुसद नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आहे. पुसदचा इतिहास गौरवशाली आहे. ज्यांच्यातून तरुणांना भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी घेतल्या गेलेल्या कष्टाची, मेहनतीची जाणीव होते. आणि स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आपुलकी निर्माण होते. जिल्ह्यात सर्वप्रथम येथून जवळच असलेल्या बेळगव्हानच्या जंगलात लोकमान्य टिळकांनी सत्याग्रह केला होता.

       पुसदला विद्येच माहेरघर असेही म्हणतात.  कारण जिल्ह्यातील पहिल्या इंजिनिअर कॉलेज ची स्थापना होण्याचा मान पुसदला मिळाला होता. पुसद हे शहर आकारमानाने बरेच मोठे आहे. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय असा सर्वांगीण विकास झालेला आपल्याला पहायला मिळते. येथे ही शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. अशा समृद्ध, संपन्न वारसा लाभलेल्या पुसदला श्री वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. शेती-मातीशी त्यांचा असलेला सलोखा आपल्याला यांच्या स्वभावाची प्रचिती देईल की. शेतकऱ्यांना ते आपुलकीने मानत. पुसदची राजकीय व्याप्ती फार मोठी होती. कारण ज्या काळात देशाला स्वातंत्र्याची वाट होती. वातावरण अगदीच सत्याग्रही झालं होतं.

       त्या काळात पुसद मधून नेतृत्व करणारी माणसे तिथे अस्तित्वात होती. मनात मातूभूमीविषयी प्रेम असणारा, सुधारणेचा पाया असणारा, महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करणारा रस्ताही पुसदमधून गेला आहे. ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. पुसद शहरातून दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. त्यामध्ये श्री. वसंतराव नाईक नंतर सुधाकरराव नाईकांच नाव पुढे येते. ज्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराच काळ जनकल्याणासाठी घालवला.

      श्री वसंतराव नाईक हे सलग ११ वर्षाचा प्रदिर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेले महान व्यक्तिमत्त्व आहे. ज्यांनी यवतमाळ जिल्ह्याचा नाव लौकिक संपूर्ण भारतात केला. आणि महाराष्ट्राला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवला. शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून लाभलेला वसंतराव नाईक हे कृषी - सुधारणेचा पाया घालणारे भूमिपुत्र होते. घाटातून मार्ग काढत जाणारा रस्ता वळण घेत पुसदला पोहोचतो त्या पुसदच श्री वसंतराव नाईक हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. पुसदच्या मातीतला हिरा आहे. ज्यांच्यावर पैलू पाडले गेले. आणि त्यांच्या सुंदर - सुलेख, रेखीव आयुष्याचा प्रभाव सर्वांवर पडला नि फक्त पुसद व आजूबाजूचा प्रदेशच नाही तर अख्या महाराष्ट्र त्यांच्या छायेखाली चकाकून निघाला.

                                                             - प्रफुल्ल भोयर ( यवतमाळ )

                                                                       ७०५७५८६४६८

क्रमशः

२ } पवित्रभूमी 

17 September 2021

युवकांनी व्यायामाचे महत्व जाणणे गरजेचे..

 युवकांनी व्यायामाचे महत्व जाणणे गरजेचे

        ◆ नेहरू युवा केंद्राचा कार्यक्रम झाला यशस्वी 

          स्पर्धेच्या युगात अनेकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे.  त्यामुळे कमी वयात शारीरिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यातून गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. व्यायामा अभावी होणारे दुष्परीणाम रोखण्यासाठी दैनंदिन जीवनात व्यायाम करणे गरजेचे आहे. म्हणून युवकांना व्यायामाचा संदेश देण्यासाठी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आजादि का अमृत महोत्सव च्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार द्वारे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम सर आणि नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे सर यांच्या मार्गदर्शनात झरी तालुक्यातील मुकुटबन येथे फिट फॉर रन 2.0 चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम नेहरू युवा केंद्राची राष्ट्रीय स्वयंसेविका प्रविणा भोयर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.

        कार्यक्रमात वनविभागाचे कुणाल सावरकर यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी रक्तविर बहुउद्देशीय संस्थचे विशेष सहकार्य मिळाले. गावातील अनेक युवक युवतींनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. फिट फॉर रन साठी कुणाल सावरकर आकाश याटकर्लेवार, वैभव गोर्लावार, प्रफुल भोयर, यांनी परिश्रम घेतले. फिट फॉर रन ची व्यायामशाळेतून सुरवात झाली. त्याअगोदर फिट फॉर रन शपथ घेण्यात आली. फिट इंडिया साठी प्रत्येक घरात व्यायाम व योगाचा संदेश पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गावागावातील असंख्य नागरिक महिला युवक युवती उपस्थित होते.










मुकुटबन येते आयोजित " फिट इंडिया फ्रीडम रन 2.0" आयोजन केलेल्या कार्यक्रमाची विविध वृत्तपत्रात घेतलेली दखल....!

सर्व वृत्तपत्रांचे मनःपुर्वक आभार....!!!
@दैनिक सकाळ, पुण्यनगरी, देशोन्नती, विदर्भ मतदार, नवराष्ट्र, सिंहझेप....

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻📰📰📰📰

08 September 2021

जोश तरुणाईचा

  ◆ जोश तरुणाईचा 💫


इच्छेपुढे तरुणाईच्या

झाले आकाश ठेंगणे।।

यशोशिखरावर चढूनी

फिटे सद्भावाचे पारणे।।


      मूठ एकवटून जेव्हा

      जागृतीने तो गर्जला।।

      सर्वत्र यश मिळवून

      चांदणे तोडण्या सरसावला।।


अगम्य आकांक्षा उरी

नवतज ते आत्म्यांतरी।।

मातीत रुजली परिश्रमाची

गोड-प्रांजळ मंजिरी।।


      ध्येय रुपी अर्णवातून

      गटांगळत न्हाला।।

     अन्यायाला विरोध करण्या 

      पुढे धजावला।।


क्षण आयुष्याचा

सिद्धी पावण्या आला।।

जोश तरुणाईचा

मला सांगूनी गेला।।

        शब्दांकन:-प्रफुल भोयर

      मो. नं:- ७०५७५८६४६८



कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...