विश्वात्मक औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
आजच्या युगात जगाने प्रचंड प्रगती केली आहे. मानवी श्रम कमी होऊन श्रमाची जागा यंत्राने घेतली आहे. मानवी बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर यंत्राची निर्मिती केली गेली. सुलभ विचारांसाठी मानवी बुद्धी एवढा दुसरा सरस कोणी असू शकेल का?
आज कोरोनामुळे संपूर्ण जग काही काळ का होईना पण थांबल! या वेळात अनेकांची मानसिकता खचायला लागली. चिंता मनात घर करु लागली. पण मानवता म्हणजे कुणाची चिंता करणं मुळीच नाही. तर आहे त्या परिस्थितीत खचून न जाता धीराने खचलेल्या मनाला आधार देणे महत्वाचं आहे. संकटात सापडलेल्यांना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करणे,याला महत्व दिल गेलं पाहिजे. कारण कुठलंही असो आपण कुणाच्या तरी कामी आलं पाहिजे. शस्त्र नाही तर एक चांगला विचारच आपल्याला योग्य अशी दिशा दाखवतो.
मनोयुद्धात आजच्या
शस्त्रांना नाही जागा...
मनाने साम्राज्य जिंकणारा
होईल इतिहासाचा धागा....
रक्तदान करण्यासाठी मनाची प्रचंड तयारी लागते. हे काम एका दानशूराकडूनच शक्य आहे. अशा दानशूरांना नियमीत रक्तदाता बनवण्याच्या हेतूने, नवीन रक्तदात्याला जोडण्यासाठी त्यांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी "विश्वात्मक औदार्य" या संकल्पनेची मांडणी करीत आहो.
14 जून 2021 ला साजऱ्या होणाऱ्या जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तविर बहुउद्देशीय संस्थेकडून 'विश्वात्मक औदार्य' हा रक्तदान जनजागृतीचा उपक्रम पुढील 15 दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिनापासून ते जागतिक रक्तदान दिना' पर्यंत राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमास आपले सहकार्य लाभून उपक्रम व्यापक व्हावा, अशी आशा करतो.
आपलाच
- प्रफुल भोयर मुकुटबन
7057586468
No comments:
Post a Comment