रक्तविराचा दिव्यांगासोबत वाढदिवस साजरा...🎂💐
वणी:- आदिवासी दुर्गम असलेल्या झरी तालुक्यातील मुकुटबन येथील रक्तविराने वणी येथील दिव्यांगासोबत वाढदिवस साजरा केला आहे. झरी तालुका म्हणजे आदिवासी बहुल तालुका, याच आदिवासी बहुल तालुक्यातील तरुण देशातील कित्येकांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहे.
रक्तदान करुन अनेकांना जीवनदान देणार ही झरी तालुक्यातील तरुण मंडळी, यात नुकताच राजस्थान येथे रक्तदान करणाऱ्या मुकुटबन येथील प्रफुल भोयर या तरुणाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणी तात्काळ रक्त उपलब्ध करुन देणाऱ्या प्रफुल चा वाढदिवस वणी येथील अपंग निवासी कर्मशाळेत मित्रासमावेत अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. तरुणांचा वाढदिवस म्हटलं की पार्ट्या, जेवणावेळी अनेक बाबी मात्र दिव्यांगासोबतवाढदिवस साजरा करुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा रक्तविर प्रफुल भोयर याने आपला वाढदिवस अपंग शाळेत साजरा करुन एक नवी दिशा दिली आहे.