विदर्भातील युवकांचा मध्य प्रदेशात सत्कार
मुकूटबन: रक्तदान जिवनदान या क्षेञामध्ये गेली चार वर्षे कार्य करत असलेल्या रक्तविर बहुउद्देशीय संस्था च्या युवकांचा मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये सत्कार करण्यात आला. दैनंदिन जिवनात सोशल मिडीया चा वापर कित्येक युवक करतात, परंतु या युवकांनी गेली चार वर्षे अतीशय चांगला उपयोग करून महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात गरजु आणि गरीब रूग्णांना रक्तदाते व रक्त उपलब्ध करून त्यांना नविन आयुष्य देण्याचे कार्य हे युवक करत आले. या सत्कार समारंभामध्ये संपुर्ण भारतातील रक्तदान क्षेञात कार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे सत्कार करण्यात आले. यावेळी रक्तविर बहुउद्देशीय संस्था चे मुकूटबन येथील गणेश मुद्दमवार, पांढरकवडा येथील प्रियल पथाडे, नागपुर येथील गोकुल जुमनाके, ब्रम्हपुरी येथील स्वप्नील अलगदेवे, यवतमाळ येथील प्रफुल भोयर या युवकांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ मध्ये प्रदेशातील सोच ब्लड गृप संस्था यांच्या तर्फे आयोजीत करण्यात आला.
No comments:
Post a Comment