11 March 2019

एक जीव वाचला...


दाह माझ्या वेदनांचा

जळतो उरात आता

पूर्ण करून संकल्प हा

टेकवुन धरणीस माथा

      ✍🏻 समाजसेवा Career ठरवून जगणारी युवापिढी देशसेवा🇮🇳 करण्यात सदैव तत्पर आहे. असाच एक अनुभव आज जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे जीवनमृत्यूशी झुंज देणाऱ्या गर्भवती ला रक्ताची अत्यंत गरज होती. यवतमाळ चे नागपूर जिल्हा पोलिस खात्यात असलेल्या भुषणदादा गिरी यांनी वेळेवर स्वैछीक रक्तदान करून सदर महिलेचा जीव वाचविला.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 

भुषणदादा गिरी (Maharashtra Police) यांच्या साठी ही माझी कविता.....

स्वतःसाठी जगता जगता

जगत आहे दुसऱ्यांसाठी

मोह मायेच्या पसाऱ्यात

रक्तदान केलं इतरांसाठी

उपकार मानू कसे मी

शब्द मजपाशी नाही

आयुष्यात तुमच्या रूपाने

देव डोकावून पाही.

धर्म-पंत-जाती पलीकडे

साऱ्यांच्या अल्याड

रक्तमासाच्या पल्याड

सुंदर नातं माणुसकीचं

कर्तव्यतत्पर तुम्ही

जनसेवेत गुंतला

अमूल्य दानाने तुमच्या

एक जीव वाचला...

       ✍🏻 प्रफुल भोयर (मुकुटबन)

           मो नं: 7057586468


      यवतमाळ: येथील सामान्य रुग्णालयात दिनांक 11/03/2019 रोजी एक गर्भवती महिला सौ. संगीताताई राठोड (सोयजना ता:मनोरा जिल्हा यवतमाळ) यांना O+ रक्ताची अत्यंत गरज होती.

     त्यांना रक्तविर बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीने  तात्काळ O+  चे एक युनिट रक्तपुरवठा आला..! रक्तदाते: भुषणदादा शुभाष गिरी (यवतमाळ येथील नागपूर पोलीस)

विशेष सहकार्य: यशवंतदादा गिरी & सुनीलदादा नलगंटीवार (MH Police) ,

गणेश मुद्दमवार, प्रफुल भोयर(Mo No: 7057586468) 🇮🇳🇮🇳💉💉❤❤😘😘🌹🌹

सभी रक्तदाते और मदतकर्ते को सलाम एवम् दि-दिल से बधाई.....

We Heartily Salute you all donars and helpers...

🌹💉💉💉🇮🇳💉💉💉🌹 रक्तविर बहुउद्देशीय संस्था.....!

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...