मुसाफिर...

 मुसाफिर

वेळ कुणाला काय सांगती।

काय चालती अवतीभवती।

वेळ काढूनी ऋतू बदलती।

कोण खरा मुसाफिर?।।


गुपित आपले मनी लपवुनी,

डाव मांडला नियतीचा,

सुख-दुःखाच्या खेळामध्ये,

सूर राखला बदलाचा।।


क्षण निसटतो आवाजाविण,

हा सृष्टीचा नियम असे।

जगू असे की क्षण प्रत्येकी।

स्नेह मनीचा नित्य वसे।।


रंग भरावे पराक्रमाने।

भविष्य कोरे का असावे।

गीत गाता आयुष्याचे।

आपण मात्र सृजन व्हावे।।

✍🏻- ॲड. प्रफुल्ल भोयर



Post a Comment

0 Comments