जागतिक रक्तदाता दिनानिमित्त "आकल्प आयुष्य व्हावे" निरंतर रक्तदानासाठी चालणारी जनजागृती मोहीम
🌱✨🩸
दीर्घकाळ आयुष्य जगण्याची इच्छा प्रत्येकालाच असते, पण अशी काही वेळ येते की एखाद्याला वेळेवर रक्त न मिळाल्याने प्राणाला मुकावे लागते. "आकल्प आयुष्य व्हावे" ही अशीच एक दीर्घ आयुष्याची सदिच्छा आहे. 'आकल्प आयुष्य व्हावे' अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पसायदानातुन व्यक्त केली, ज्याचा अर्थ प्राणिमात्रांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य मिळावे असा होतो. रक्तदानाशी जोडलेला हाच अर्थ जीवनदान देण्याची क्षमता दर्शवते.
जेव्हा आपण रक्तदान करतो, तेव्हा नवीन आयुष्यच देत असतो. रक्तदान म्हणजे या सदिच्छेचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर आहे. फक्त "दीर्घायुषी हो" असा तोंडी आशीर्वाद देण्याऐवजी, रक्तदान करून आपण त्याचे आयुष्य वाढवण्यास प्रत्यक्ष मदत करू शकतो ती मानवतेची सेवा आहे. ज्यातून स्वतःच्या रक्ताचा अंश दुसऱ्याचे आयुष्य 'आकल्प' (दीर्घ) करते. हाच या संकल्पनेचा रक्तदानाच्या संदर्भातील खरा आणि उदात्त अर्थ आहे.
आयुष्याचे सुंदर क्षण अनुभवण्याचा अधिकार सर्वाना आहे. ते अनुभवताना मानवतेची मूल्य सांभाळली जावीत. सदविचाराची कास सोडता कामा नये आपलं मन करुणेचा सागर आहे त्या सदैव आपुलकीची भावना राहते. त्याच भावनेतून मदतीचा एक हात देता यावा "आयुष्य सकळा मिळो" हा आपला संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी धुरंधर दाता तयार होऊन मानवतेची जागृती व्हावी एवढाच मोहिमे मागील उद्देश.
आपल्या जीवनाचा अमुल्य क्षण ज्यांनी सेवेत वाहतात आणि अविरतपने समाजासाठी काहीतरी करण्याचा मानस ठेवतात त्या सर्वांचे आभार !
संयोजक-प्रफुल भोयर ( यवतमाळ )

0 Comments