माननीय प्राचार्य सर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
पाठपुस्तकांच्या पलिकडे जाऊन समाजाप्रती असलेली आमची जबाबदारी आमच्यात रुजवल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय कायद्याच्या गुंतागुंतीतून नैतिक मुल्यांचे केंद्र बनले. असा गौरवशाली प्रवास न्याय आणि शिक्षण क्षेत्रातील तुमचा वारसा आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील. इथली शिस्तप्रिय संस्कृती आणि ज्ञान हाच महाविद्यालयाचा पाया आहे. याला आधार देऊन आपल्या कर्तृत्वाने, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेने जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले आहे. वेळेचे नियोजन, कामातील अचूकता आणि पारदर्शकता ही तुमच्या प्रशासनाची ओळख आहे. सर्वच विद्यार्थ्यांमध्ये तुमची कमालीची लोकप्रियता आहे. कारण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सातत्याने तुम्ही करत आला आहात, तुमच्या निरंतर चालणाऱ्या ज्ञानसेवेतून अन्यायाविरुद्ध लढण्याचा, आपले पाय भक्कम रोवून कर्तृत्व गाजवण्याचा सुवर्ण प्रवास पार करण्यास तुमच्या विचारांची शिदोरी कायम सोबत आहे.
कायद्याच्या क्षेत्राला लाभलेले आमचे आधारस्तंभ म्हणजे प्राचार्य सर शैक्षणिक प्रगतीबरोबरच कोणत्याही प्रसंगात विद्यार्थ्यांबरोबर खंबीरपणे उभे राहतात. ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे खरे शिक्षण होय, हा विचार त्यांनी विद्यार्थी मनावर बिंबवला. त्यांचे शैक्षणिक, प्रशासकीय सोबतच सामाजिक योगदान नेहमीच दिशादर्शक आहे. त्यामुळे सरांचे व्यक्तिमत्त्व केवळ महाविद्यालयाच्या भिंतीआत मर्यादित नाही तर अष्टपैलू आहे. उत्तम वकील सोबत उत्तम नागरिक घडवतांना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी हा त्यांचा नेहमी कटाक्ष असतो.
सर एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व आहे. ज्यांना मला जवळून पाहायला, अनुभवायला आणि शिकायला मिळाले. जीवनाच्या अमूल्य वेळी सरांची लाभलेली साथ मला उतुंग भरारीसाठी पंखात बळ देते. शिवाय कौतुकाची, आपुलकीची थाप संधीची कवाडे उघडून मानवतेची शिकवण देते.
आमच्या कायदेशीर प्रवासाचा सारथी असल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर !
शब्दांकन/शुभेच्छुक :- प्रफुल्ल भोयर

0 Comments