“रक्तदान श्रेष्ठ दान” ही उक्ती फक्त एक घोषवाक्य नाही, तर जीवनाचे खरे मूल्ये सांगणारे शाश्वत सत्य आहे. जगात कोणतेही दान पैशाने, वस्तूने किंवा वेळेने केले तरी ते मर्यादित असते; पण रक्तदान मात्र थेट एका जीवाला दुसऱ्या जीवाशी जोडते. हेच कारण आहे की रक्तदानाला सर्व दानांमध्ये सर्वोच्च स्थान दिले जाते.
रक्तदान हे दान श्रेष्ठ आहे कारण यात स्वार्थाला थारा नाही. म्हणून रक्तदानाला एक पवित्र आयाम मिळतो. यात अपेक्षा शून्य असते. म्हणूनच रक्तदान करा. पुन्हा पुन्हा करा. कारण प्रत्येक थेंबात एक जीवन दडलेले आहे आणि ते जीवन फक्त तुम्हीच वाचवू शकता. असा संदेश देत प्रद्युम्न जवळेकर, अनिकेत कावळे, प्रफुल भोयर यांनी तरुणांना प्रेरणा दिली. याच सामाजिक जागृतीचा वारसा कायम ठेवत रक्तदाता यश बोरेकर आणि योगेश तरोने या रक्तदात्यांकडून गरजूंसाठी रक्तदान करवून घेतले. हे रक्तदान समाजसेवेत सहभागी होण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देते.
![]() |
| रक्तदाता यश बोरेकर |
![]() |
| रक्तदाता योगेश तरोने |





0 Comments