यवतमाळ:- स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात संविधान दिन "संविधानाची पंचाहत्तर वर्षे" या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विजेश मुणोत, प्रा. डॉ. संदीप नगराळे, डॉ. वैशाली फाळे, डॉ. स्वप्नील सगणे, प्रा. वंदना पसारी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. संदीप नगराळे यांनी मार्गदर्शन केले.
भारतीय संविधान सर्वसामान्य लोकांच्या मुलभूत गरजा पुर्ण करणारे असल्यामुळे श्रेष्ठ आहे आणि लोकशाही पध्दतीचा पुरस्कार करत असल्यामुळे त्याचे मुल्य जागतिक स्वरूपाचे आहे. पंचाहत्तर वर्षात आपण अनेक क्षेत्रात प्रगती केली परंतु काही ज्वलंत प्रश्न निर्माण झाले आहेत ते सांविधानीक नितिमत्ता बाळगून लोकशाही च्या तिन्ही स्तंभाकडून सोडविले पाहीजे असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा संदर्भ देत लोकशाही चे रक्षण करायला पाहिजे असे विवेचन त्यांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. विजेश मुणोत यांनी शासनाच्या तिन्ही अंगांनी एकमेकांच्या सहकार्याने कामकाज केल्यास सुदृढ लोकशाही टिकून राहील अशी भुमीका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निवाड्यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ . वैशाली फाळे ह्यांनी संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन केले तसेच कार्यक्रमाची भुमिका विषद केली. संचालन कु. वेदश्री राजूरकर हिने तर आभार डॉ. स्वप्नील सगणे ह्यांनी पार पाडले. यावेळी प्रा. वंदना पसारी, प्रा. अमिता मुंधडा, प्रा. पल्लवी हांडे, प्रा. शंतनू कनाके तथा विद्यार्थ्यांची उपस्थिती होती .








0 Comments