विद्यार्थ्यांना आधुनिक कायदे क्षेत्रातील नव्या संधींचे मार्गदर्शन...

कलिंगा विद्यापीठाचे डॉ. अजीमखान पठाण यांचे दर्डा विधी महाविद्यालयात प्रेरणादायी व्याख्यान

विद्यार्थ्यांना आधुनिक कायदे क्षेत्रातील नव्या संधींचे मार्गदर्शन

यवतमाळ : स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ हे जिल्ह्यातील प्रमुख विधी महाविद्यालय असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. प्रत्येक महिन्यात विधी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कायद्याच्या शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही मिळते.

अशाच उपक्रमांतर्गत कलिंगा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अजीमखान पठाण यांचे प्रेरणादायी व्याख्यान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील कायदे व्यवसायातील बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कायदे, सायबर लॉ, डेटा गोपनीयता आणि संशोधनातील नव्या संधी याविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना कायदे शिक्षणाचे महत्त्व आणि त्यातील व्यापकता स्पष्ट केली. व्यासपीठावर डॉ. संदीप नगराळे, डॉ. स्वप्नील सगणे आणि डॉ. वैशाली फाळे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.



Post a Comment

0 Comments