स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात दोन दिवशीय इंडक्शन व फ्रेशर वेलकम कार्यक्रम उत्साहात संपन्न...

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात दोन दिवशीय इंडक्शन व फ्रेशर वेलकम कार्यक्रम उत्साहात संपन्न


यवतमाळ– स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी  महाविद्यालय, यवतमाळ येथे प्रथम वर्षीय विद्यार्थ्यानं करिता दोन दिवशीय परिचय (इंडक्शन) व फ्रेशर वेलकम कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 

पहिल्या दिवशी या सोहळ्याचे उद्घाटन चार्टर्ड अकाउंटंट व वि. प्र. मं. चे सचिव मा. श्री. पी. डी. चोपडा, डॉ. आर. बी. भांडवलकर, प्राचार्य अमोलकचंद महाविद्यालय तसेच डॉ. विजेश मुनोत, प्राचार्य, स्वा. से. जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यवतमाळ, डॉ. संदीप नगराळे, आयक्यूएसी समन्वयक, डॉ. स्वप्निल सगणे, कार्यक्रम समन्वयक, डॉ. वैशाली फाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या दोन दिवशीय कार्यक्रमात प्राचार्य डॉ. विजेश मुनोत, डॉ. संदीप नगराळे, डॉ. स्वप्नील सगणे, डॉ. वैशाली फाळे, प्रा. वंदना पसारी, श्री. मनोज गौरखडे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व समिती, परीक्षा, शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन सर्व कामकाज इत्यादी बदल सविस्तर माहिती दिली. 

इंडक्शन कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्या मधे, मिस्टर अँड मिस फ्रेशर स्पर्धे मध्ये यासीन मलनस हा मिस्टर फ्रेशर आणी  आदिती नखाले ही मिस फ्रेशर ठरली, तसेच डांस, कराओके सिंगींग, फिश पाँड, शायरी, कविता वाचन इत्यादि कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. 

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करीता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोठे योगदान लाभले.





Post a Comment

0 Comments