स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा संपन्न
यवतमाळ, दि. 17 सप्टेंबर 2025 – स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालय, यवतमाळ येथे आज दिमाखदार पदवी वितरण सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान नामांकित चार्टर्ड अकाउंटंट व वि. प्र. मं. चे सचिव मा. श्री. पी. डी. चोपडा यांनी भूषविले.
या प्रसंगी मान्यवर पाहुणे म्हणून डॉ. आर. बी. भांडवलकर, प्राचार्य अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ तसेच डॉ. विजेश मुनोत, डॉ. संदीप नगराळे, आयक्यूएसी समन्वयक, डॉ. स्वप्निल सगणे, कार्यक्रम समन्वयक, व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रस्तावना प्राचार्य डॉ. विजेश मुनोत यांनी करून पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणात त्यांनी विधी शाखेतील पदवी ही केवळ शिक्षणाची पूर्तता नसून व्यावसायिक जीवनाची सुरुवात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासाची प्रेरणा दिली.
यानंतर अध्यक्षीय भाषणात मा. श्री. चोपडा यांनी विद्यार्थ्यांना कायदा व्यवसायात प्रामाणिकपणे, निष्ठेने व समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी विधिज्ञान हे सतत अध्ययन व अनुभवानेच परिपूर्ण होत असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैशाली फाळे यांनी आकर्षक पद्धतीने केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्वप्निल सगणे यांनी करून मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर दोन दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम व फ्रेशर्स वेलकमचे आयोजन करण्यात आले आहे.
.jpg)
0 Comments