09 November 2023
राष्ट्रीय विधी सेवा दिनी कायदेविषयक शिबीर व रॅली....
यवतमाळ:- विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व
सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे साहेब यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश ए.ए. लउळकर साहेब,
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टि. जैन साहेब, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव
के.ए. नहार साहेब, मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी
महाविद्यालय व महात्मा जोतीबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरा विधी
स्वंयसेवक उपस्थित होते.
20 September 2023
रक्तवीरच्या अविरत सेवेची यशपूर्ती....💉
रक्तवीरच्या अविरत सेवेची यशपूर्ती....💉🩸
जिल्ह्यातील सक्रिय रक्तवीरांपैकी काही नेहमीच गरजूंची मदत करीत असतात. सामाजिक भावनेतून घडलेली सेवा मानवता स्तर उंचावत असतात. श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णासाठी रक्तदाते प्रविण दादा भानखेडे आणि रक्तदाते वैभव ताटेवार यांनी रक्तदान करून सेवा सक्रीयतेची पावती दिली.
एका जीवाचे महत्व लक्षात घेता या दात्यांनी केलेल्या कृतीतून पुण्यकर्माचे वाटेकरी होऊन रुग्णाला आनंद दिला आहे. हेच कार्य निःशंक रक्तवीरच्या अविरत सेवेची यशपूर्ती ठरली...
~प्रफुल्ल भोयर
#Bravery_Raktveer
01 September 2023
15 August 2023
स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाकडून अंगणवाडी सेविकेचा सन्मान...
स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाकडून अंगणवाडी सेविकेचा सन्मान यंदा भारतभर 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी वीरांच्या स्मृतींना उजाळा दिला जाऊन त्यांचा गौरव केला जातो.
या स्वातंत्र दिनाच्या शुभ औचित्यावर तहसील कार्यालय महसूल विभाग झरी जामनी यांचे हस्ते अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा गणपत भोयर यांचा सन्मान करण्यात आला.
घरोघरी जाऊन मतदार जनजागृती आणि आपले कार्य उत्कृष्टपणे पार पाडून महसूल प्रशासनास बहुमोल मदत केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
वणी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून मतदारांच्या सर्व्हेक्षणाचे १००% काम विहित मुदतीचे आत करून उत्कृष्ठ कामगिरीसाठी हा सन्मान उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी वणी विधानसभा यांचेकडून श्रीमती नंदा गणपत भोयर यांना बहाल करण्यात आला.
यावेळी माननीय तहसीलदार श्री महेश रामगुंडे साहेब, पाटण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील साहेब, तालुका आरोग्य अधिकारी श्री. मोहन गेडाम साहेब, मतदान अधीकारी, तहसील कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
05 July 2023
वाढदिवशी केले रक्तदान वाचविले रुग्णाचे प्राण...
वाढदिवशी केले रक्तदान वाचविले रुग्णाचे प्राण
मानवतेच्या संवर्धनासाठी केलेला उपाय असेही रक्तदानास म्हंटले जाते. गरजूंना रक्तदान करून कित्येकांच्या जीवनात नवचतनेने पुनर्जीवन मिळते. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील दवाखान्यातील श्याम बांते या पेशंटसाठी आकाश जीवतोडे या युवकाने आपल्या वाढदिवशी रक्तदान करून मानवतेच्या संवर्धनासाठी मोठी मदत केली आहे. जिल्ह्यात रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असल्याचे आपल्याला पहावयास मिळते, कुणाचाही रक्ताविना जीव जाऊ नये अशी म्हणणारी बरीच मंडळी स्वतःहून रक्तदान करण्यासाठी पुढे येतात. वाढदिवसाचे औचित्य मात्र सर्वांसाठी अगत्याचे आहे. वाढदिवसाच्या शुभ प्रसंगी आकाश जीवतोडे यांनी यांनी स्वैच्छिक रक्तदान करून रुग्णास मोठी मदत केली आहे.
- प्रफुल्ल भोयर
#Bravery_Raktveer
03 July 2023
12 June 2023
08 June 2023
06 June 2023
रक्तदान जनजागृती अभियानाची सुरवात....
रक्तदान जनजागृती अभियानाची सुरवात....
|
13 May 2023
Subscribe to:
Posts (Atom)
कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....
प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता ◆ कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...
-
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल भोयरच्या विश्वात्मक औदार्य चे विमोचन बळीराजा चेतना भवन येथे ग्राहक दिन साजरा ग्राहकाला केंद्रस्थ...
-
यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव... रक्तदानाच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी दिला पहिला सामाजिक पुरस्कार यवतमाळ जिल्हा साहित्य...