31 May 2022

रक्तदान जनजागृती चळवळ "प्राणदाता-रक्तदाता"

रक्तदान जनजागृती चळवळ

प्राणदाता-रक्तदाता

◆ जागतिक रक्तदान दिनानिमित्त...

           दरवर्षी 14 जून हा दिवस सर्वत्र जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. Father Of Transfusion Medicine म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीन यांनी वैद्यकीय शास्त्रात रक्तगटाच्या वर्गीकरणाने महत्वपूर्ण योगदान दिले या स्मृतिप्रीत्यर्थ 14 जुन हा दिवस "जागतिक रक्तदान दिन" म्हणून साजरा होतो.

           रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये, रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताची कमतरता पडू नये म्हणून रक्तदान करावे, हे सांगणारा दिवस.

          या दिवसाच महत्व लक्षात आणून रक्तदानाचा संदेश प्रत्येका पर्यंत पोहोचविण्यासाठी आपण आज पासून जागतिक रक्तदान दिनापर्यंत "प्राणदाता-रक्तदाता" ही जनजागृती चळवळ राबवित आहो. एक जबाबदार नागरिक या नात्याने मी दरवर्षी प्रमाणे यंदाही 15 दिवशीय रक्तदान जनजागृती मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. ही चळवळ वजा मोहीम संपूर्ण विदर्भात राबविल्या जात आहे. याद्वारे मी विविध मार्गांनी रक्तदानाचा संदेश रक्तदाते युवक-युवतीपर्यंत पोहोचवनार आहो. यामुळे स्वयंप्रेरनेतून नवीन रक्तदाते तयार होईल. शिवाय इतरांना मदत करण्याची वृत्ती बळावेल ज्यामुळे मानवता अबाधित राहील.

           यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि चळवळ यशस्वी करावी.

          चला आपणही रक्तदान करूया!


पुसले जाईल अश्रु

माणुसकीच्या संदेशात ।

रक्ताने जीव वाचेल

रक्तविरांच्या देशात ।।


संकल्पना / संयोजक

प्रफुल भोयर मुकुटबन

7057586468



No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...