जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा सत्कार....
◆रक्तदान क्षेत्रातील बहुमोल कार्याचा गौरव
🩸🙏🏻🇮🇳
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल चा सन्मान
◆ जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
जिल्ह्यातील रक्तदानाच महत्वाचं कार्य करणारी एकनिल रक्तपेढी यवतमाळ ही यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या औचित्यावर 9 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने वर्धापन दिनाच्या दिवशी रक्तदात्यांचा, शिबीर आयोजकांचा सन्मान करण्यात आला.
झरी तालुक्यातील मुकुटबन येथील प्रफुल भोयर हा युवक रक्तदान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर अमूल्य योगदान देत आहे. त्यांनी केलेल्या बहुमोल कार्याची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे साहेब यांच्या हस्ते प्रफुलचा सन्मान करण्यात आला. प्रफुल यांनी जिल्ह्यासोबत महाराष्ट्रातील रक्तदानाची चळवळ बळकटीकरनाचे मोलाचे कार्य केले आहे.
No comments:
Post a Comment