"आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा सर"
◆ निश्चयाचा महामेरु
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, लॉकडाऊनच्या काळात गरजवंतांच्या मदतीला धावणारे, कठीणातील कठीण प्रसंगात पुन्हा धीराने उभ राहण्याचं बळ देणारे, आपल्या कार्याने मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आशिष खडसे सर.
पृथ्वीतलावर जगताना मानवाने आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर प्रगती साधली. शिक्षणाने वैचारिकतेची ठिणगी मनामनात पोहचली. धकाधकीच्या काळात पत-प्रतिष्ठा अबाधित ठेऊन चांगला माणुस बनण्यासाठी मनी सेवाभाव जोपासला जातो. कठोर मेहनतीतून पुढे आलेले खडसे सर यांच्या प्रवासही सेवेने घेतला. समाजात अनेकांच्या अडचणी, दुःख आपल्याला सहजच पाहायला मिळते. अश्यांना वाईट वेळेत फक्त धीराने दोन शब्द हवे असतात. समजाविषयी असलेल्या आपुलकी, आस्थेतुन ते अडचणीत असणाऱ्यांना शक्य तितकी मदत करत असतात. अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतात.
खडसे सर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्यांची जीवनशैली अतिशय साधी व सरळ आहे. मानवतेच्या सेवेच्या क्षेत्रात काम करताना, जनसेवा हीच ईश्वर सेवा या अनुसार त्यांचे कार्य आहे.ते आज शासकीय रक्तपेढी येथे कार्यरत आहे. रुग्ण व नातेवाईकांचा एकमेकांशी समन्वय साधून रुग्ण नातेवाईकांना धिर देण्याचे कार्य करतात.
आज मानवतेची व्याख्या कशी करावी, हे कुणालाच सांगावे लागत नाही. फक्त 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या ओळी नुसार प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असते आणि जगण्याची रितही. खुप काही असून स्तब्ध बसणारे तर काही नसतानाही दुसऱ्यांच्या पदरात आपली ओंजळ रिकामी करणारे भेटतात. त्यातलेच एक खडसे सर त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपण्याच्या संकल्पाला विशेष महत्त्व देऊन कटिबद्ध आहे, हेही तेवढेच खरे.
- प्रफुल भोयर
#Bravery_Raktveer
No comments:
Post a Comment