31 May 2022

रक्तदान जनजागृती चळवळ "प्राणदाता-रक्तदाता"

रक्तदान जनजागृती चळवळ

प्राणदाता-रक्तदाता

◆ जागतिक रक्तदान दिनानिमित्त...

           दरवर्षी 14 जून हा दिवस सर्वत्र जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. Father Of Transfusion Medicine म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीन यांनी वैद्यकीय शास्त्रात रक्तगटाच्या वर्गीकरणाने महत्वपूर्ण योगदान दिले या स्मृतिप्रीत्यर्थ 14 जुन हा दिवस "जागतिक रक्तदान दिन" म्हणून साजरा होतो.

           रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये, रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताची कमतरता पडू नये म्हणून रक्तदान करावे, हे सांगणारा दिवस.

          या दिवसाच महत्व लक्षात आणून रक्तदानाचा संदेश प्रत्येका पर्यंत पोहोचविण्यासाठी आपण आज पासून जागतिक रक्तदान दिनापर्यंत "प्राणदाता-रक्तदाता" ही जनजागृती चळवळ राबवित आहो. एक जबाबदार नागरिक या नात्याने मी दरवर्षी प्रमाणे यंदाही 15 दिवशीय रक्तदान जनजागृती मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. ही चळवळ वजा मोहीम संपूर्ण विदर्भात राबविल्या जात आहे. याद्वारे मी विविध मार्गांनी रक्तदानाचा संदेश रक्तदाते युवक-युवतीपर्यंत पोहोचवनार आहो. यामुळे स्वयंप्रेरनेतून नवीन रक्तदाते तयार होईल. शिवाय इतरांना मदत करण्याची वृत्ती बळावेल ज्यामुळे मानवता अबाधित राहील.

           यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि चळवळ यशस्वी करावी.

          चला आपणही रक्तदान करूया!


पुसले जाईल अश्रु

माणुसकीच्या संदेशात ।

रक्ताने जीव वाचेल

रक्तविरांच्या देशात ।।


संकल्पना / संयोजक

प्रफुल भोयर मुकुटबन

7057586468



28 May 2022

"आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा खडसे सर"

"आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा सर"

◆ निश्चयाचा महामेरु
          कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, लॉकडाऊनच्या काळात गरजवंतांच्या मदतीला धावणारे, कठीणातील कठीण प्रसंगात पुन्हा धीराने उभ राहण्याचं बळ देणारे, आपल्या कार्याने मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आशिष खडसे सर.
        पृथ्वीतलावर जगताना मानवाने आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर प्रगती साधली. शिक्षणाने वैचारिकतेची ठिणगी मनामनात पोहचली. धकाधकीच्या काळात पत-प्रतिष्ठा अबाधित ठेऊन चांगला माणुस बनण्यासाठी मनी सेवाभाव जोपासला जातो. कठोर मेहनतीतून पुढे आलेले खडसे सर यांच्या प्रवासही सेवेने घेतला. समाजात अनेकांच्या अडचणी, दुःख आपल्याला सहजच पाहायला मिळते. अश्यांना वाईट वेळेत फक्त धीराने दोन शब्द हवे असतात. समजाविषयी असलेल्या आपुलकी, आस्थेतुन ते अडचणीत असणाऱ्यांना शक्य तितकी मदत करत असतात. अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतात.

         खडसे सर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्यांची जीवनशैली अतिशय साधी व सरळ आहे. मानवतेच्या सेवेच्या क्षेत्रात काम करताना, जनसेवा हीच ईश्वर सेवा या अनुसार त्यांचे कार्य आहे.ते आज शासकीय रक्तपेढी येथे कार्यरत आहे. रुग्ण व नातेवाईकांचा एकमेकांशी समन्वय साधून रुग्ण नातेवाईकांना धिर देण्याचे कार्य करतात.
        आज मानवतेची व्याख्या कशी करावी, हे कुणालाच सांगावे लागत नाही. फक्त 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या ओळी नुसार प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असते आणि जगण्याची रितही. खुप काही असून स्तब्ध बसणारे तर काही नसतानाही दुसऱ्यांच्या पदरात आपली ओंजळ रिकामी करणारे भेटतात. त्यातलेच एक खडसे सर त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपण्याच्या संकल्पाला विशेष महत्त्व देऊन कटिबद्ध आहे, हेही तेवढेच खरे.
- प्रफुल भोयर
#Bravery_Raktveer

14 May 2022

जन्मदिनी मी रक्तदाता झालो, तिन जीवांच्या कामी आलो....

 


रक्तदान करुन जन्मदिवस साजरा.....🎉

रक्तविर सुरज दादा दिघडे🎂

◆ यवतमाळ जिल्हा रक्तपेढी गृप चा उपक्रम

@ श्री वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ

🩸🩸🩸🩸🩸🩸

जन्मदिनी मी रक्तदाता झालो,

तिन जीवांच्या कामी आलो.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


प्रफुल भोयर

यवतमाळ जिल्हा रक्तपेढी गृप

रक्तविर बहुउद्देशीय संस्था

7057586468





08 May 2022

जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा सत्कार....

 


जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा सत्कार....
◆रक्तदान क्षेत्रातील बहुमोल कार्याचा गौरव

🩸🙏🏻🇮🇳

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल चा सन्मान 
◆ जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

            जिल्ह्यातील रक्तदानाच महत्वाचं कार्य करणारी एकनिल रक्तपेढी यवतमाळ ही यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या औचित्यावर 9 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने वर्धापन दिनाच्या दिवशी रक्तदात्यांचा, शिबीर आयोजकांचा सन्मान करण्यात आला. 
          झरी तालुक्यातील मुकुटबन येथील  प्रफुल भोयर हा युवक रक्तदान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर अमूल्य योगदान देत आहे. त्यांनी केलेल्या बहुमोल कार्याची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे साहेब यांच्या हस्ते प्रफुलचा सन्मान करण्यात आला. प्रफुल यांनी जिल्ह्यासोबत महाराष्ट्रातील रक्तदानाची चळवळ बळकटीकरनाचे मोलाचे कार्य केले आहे.
          
केलेल्या कार्याची दखल #कौतुक।।

















07 May 2022

जिल्हा प्रशासन, यवतमाळ तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन..


जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन।।

"रक्ताला नसते कोणती जात आणि पात, 
एक तेच तर आहे
जे करते सर्व धर्मावर मात"

स्थळ :- बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ
दिनांक :- ०८ मे, २०२२ सकाळी :- ९ वाजता.



05 May 2022

आरोग्य तपासणी शिबिर...

 


◆ अंगणवाडी केंद्र येदलापूर येथे बालकांची आरोग्य तपासणी शिबीर 












कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...