🌱❤️✨
प्रफुल भोयर (मुकुटबन)✨
जामणी येथील जिल्हा परिषद शाळेत श्रमदान जनजागृती अभियान
◆ जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांसह युवकांनी दिला समाजासाठी संदेश
नेहरू युवा केंद्र यवतमाळ कडून झरी तालुक्यातील गावस्तरावर प्रत्येक गावात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने झरी तालुक्यातील जामणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत श्रमदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन श्रमदान करण्याची गरज आहे. श्रमदानातुन गावास स्वच्छ, सुंदर आणि स्वयंपूर्ण करता येते. हा संदेश गावागावात पोहोचावा आणि आचरणात यावा, यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामणी येथील चिमुकल्यांसह युवकांनी श्रमदानाचा संदेश दिला.
आपल्या निरागसतेतून युवकांना मेहनत, चिकाटी आणि जिद्दीची साथ लाभली तर मनात येईल ते काम साध्य करता येते हा विश्वास शाळेतील मुलांनी जागविला.
यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. मडावी सर, मेश्राम सर, अक्कलवार मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे राहुल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते निखिल वनकर, विनोद मेश्राम, श्रीकांत पाबतवार, गुलाब लेनगुळे, बाळकृष्ण भोयर, दिनेश वडस्कर, बाळू टेकाम आणि बरेच युवक उपस्थित होते. नेहरू युवा केंद्र आणि समाज या विषयावर यावेळी चर्चा केली. सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान केल्यास गावाचा विकास निश्चित आहेत. असे विचार चर्चसत्रात उपस्थितांनी मांडले शाळेच्या विकासासाठी आम्ही सदैव अग्रेसर राहू, असे विचार यावेळी मुख्याध्यापक सर यांनी व्यक्त केले. तरुणांसाठी आपण एकीने प्रयत्न करत आहो आणि पुढेही करू, असा विश्वास गाव युवा मंडळाचे अध्यक्ष निखिल वनकर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम आणि अनिल ढेंगे सर यांच्या मार्गदर्शनात प्रफुल भोयर यांनी केलं. तर प्रास्ताविक आणि आभार नेहरू युवा केंद्र यवतमाळ च्या राष्ट्रीय स्वयंसेवक कु. प्रविणा भोयर यांनी मानले.
फोटो:- जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांसह युवकांनी दिला श्रमदानाचा संदेश
No comments:
Post a Comment