◆◆ मातृभाषा आमुची मराठी ◆◆
भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. आज २१ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात शांतता व बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी सण २००० पासून हा दिवस साजरा करण्यात येतो.
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात प्रत्येक राज्याची स्वतःची विशिष्ट अशी भाषा पाहायला मिळते.
बोलण्यासाठी, एकमेकांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. भाषा नसती तर आपण सर्वजण अबोल राहिलो असतो. त्यामुळे आपल्या जीवनात भाषेला खूप महत्वाचे स्थान आहे.
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. अमृताहूनी गोड मराठी भाषा असा उल्लेख अनेक अंगाने केलेला आपल्याला पहायला मिळतो. मराठी भाषेत विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे भाषेचे संवर्धन होताना दिसते.
माणसाच्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा अथवा प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा होय.
एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याच्या भाषेवरून ठरवले जाते. व्यक्तीला योग्य दर्जा देण्यासाठी मातृभाषा योग्य भूमिका बजावत असते.
आपल्या सभोवतालचा विकास व्हावा असे वाटत असेल तर आपल्या मातृभाषेचा विकास करणे खूप गरजेचे आहे.
२७फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.
त्यानिमित्त २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ते 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन दरम्यान मातृभाषा आमुची मराठी हा मराठी भाषा सप्ताह राबविण्यात येत आहे.
संकल्पना
प्रफुल भोयर - मुकुटबन
रक्तविर बहुउद्देशिय संस्था यवतमाळ
७०५७५८६४६८
👌👌👌
ReplyDelete