रक्तवीर कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित
◆ सेवेतही ठरत आहे अग्रेसर
माणुसकी जपणे हीच मानव सेवेची सर्वोत्तम संधी आहे. ही संधी मिळणे कठीणच. रक्तवीर ने ही संधी पकडली आणि त्याच सोन केलं. आजच्या स्थितीला रक्तवीर ने दिलेल्या रक्तदात्यांचा उच्चांक गाठला आहे. रक्तदानाच महत्व प्रत्येक दात्यांपर्यंत पोहोचविण्यात रक्तवीर यशस्वी ठरली आहे. कोविड काळात राबवलेल्या अनेक संकल्पनांना मेहनतीचा आधार घेऊन दिलेलं रूप रुग्णांना जगण्याचा विश्वास प्रदान करते. याचे फलस्वरूप म्हणून आज मैत्री जनसेवा बहुउद्देशीशिय संस्था अमरावती यांचे कडून रक्तवीर ला कोविड योद्धा सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी मैत्री जनसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव अभिषेक ठाकूर उपस्थित होते. कोविड योद्धा म्हणून रक्तवीर चे यशवंत गिरी, मोनेश्वर खंडरे आणि प्रफुल भोयर यांचा सत्कार करण्यात आला. अमरावती रक्तदाते बहुउद्देशीय संस्थेचे मानद अध्यक्ष जयपाल उत्तमानी यांचाही सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment