रक्ताच्या नात्याने केला रक्तवीर चा सत्कार....
रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट चा अनोखा उपक्रम-राबवले आंतर राज्यीय रक्तदान शिबिर
आपल्या आयुष्याचा द्विदशकापेक्षाही जास्त काळ ज्यांनी गरजूंना जिवदान देण्यासाठी उपयोगी आणला आणि स्वतःस झोकून देऊन रक्तदानाच महत्त्व सर्वदूर पोहोचवलं असे श्री राम बांगड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुण्याच्या बिबवेवाडी येथील महेश सांस्कृतिक भवनात आंतरराज्यीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात भारताच्या विविध राज्यातुन रक्तदानासाठी युवकांची उपस्थिती होती. राम बांगड यांच्या १४१ व्या रक्तदानानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा आणि रक्त समन्वयक यांचा गौरव सोहळा घेण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील एक यशस्वी व्यक्ती म्हणून राम बांगड यांचं नाव आदरपूर्वक घेतलं जाते. ते ज्या क्षेत्रात स्वतःच योगदान देतात त्याला मानवतेच सर्वोच्च दान असे म्हणतात. राम बांगड यांच्या प्रेरणेतून प्रफुल्ल भोयर यांनी सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
रक्त म्हणजे मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक आहे. दैनंदिन जीवनात रक्ताची गरज मोठया प्रमाणात आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदाते जोडण्याच महत्वाचं काम प्रफुल्ल भोयर करत असतो, या महान कार्याची दखल म्हणून रक्ताचे नाते ट्रस्ट तर्फे यवतमाळ च्या प्रफुल्ल भोयर चा सत्कार करण्यात आला. या महान दानाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचे प्रफुल्ल भोयर, अभिषेक ठाकूर व राहुल कुरझडकर, पुरुषोत्तम पुरी, अर्पित वाघमारे यांचा राम बांगड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रक्तदान या सर्वश्रेष्ठ क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल यांचा हा सत्कार करण्यात आला. तब्बल ८०० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान करून शिबिराची सांगता केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश बांगड आणि परिवाराने प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment