23 February 2021

'शिक्षक - भावी पिढीचा शिल्पकार आदरणीय दरणे सर'


       शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जी त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन प्रत्येकाचे भविष्य घडवते. शिक्षकाचे बरेचसे गुण विद्यार्थ्यांच्या
यशस्वी जीवनाला घडवण्यास सक्षम असते. एका चांगल्या राष्ट्राचा निर्माता म्हणून शिक्षकांकडे पाहिले जाते. विद्यार्थी जिवनात खरा मार्ग ठरविण्यात मदत करणारे शिक्षक विद्यार्थ्यांचे चांगले मित्र असतात.
         यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाचे मा. दरणे सर हे एक उत्कृष्ट शिक्षक आहेत. ज्यांनी कित्येक उत्कृष्ट समाजसेवक घडवले आणि घडवित आहेत. तरुणांचे युथ आयकॉन असलेले प्रा. दरणे सर हे सावित्री जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आहे. विद्यार्थीप्रिय दरणे सर आपल्या विद्यार्थ्यांना, समाजसेवेबरोबरच, धाडस शिकवतात. सम-विषमतेच्या जाणिवेतून जिवन जगण्याचे नीतिमूल्ये शिकवितात. येणाऱ्या प्रत्येक संकटावर काळानुसार मात करुन यशस्वी होण्याची सूत्रे सांगतात. दरणे सर हे प्राध्यापक व समाजसेवक एवढेच मर्यादित नाही. तर त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या परीघाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचे महत्वाचे काम ते करतात. विद्यार्थ्यांमार्फत समाजाला घडवणारे सर हे उत्तम साहित्यिक आहेत. यवतमाळ येथील ९२ व्या अखिल भारतीय मराठी  साहीत्य संमेलनात त्यांनी एक मोठी भूमिका बाजवली. त्यांनी आजपर्यत स्वतःला फक्त समाजासाठी वाहून घेतल्याचे त्यांच्या कार्यातून कळते. विद्यादानाबरोबरच ते नैसर्गिक आपत्ती मध्ये अडकलेल्याना पुढाकार घेऊन जगण्याची आशा दाखवतात. अन्नदान, वस्त्रदान आणि रक्तदान इत्यादी शिबिरांचे आयोजन करुन ते समाजासाठी नेहमीच मदत कार्य करीत असतात. या चळवळी उभारुन आपल्या विद्यार्थ्यांना अशा समाजोपयोगी कामासाठी प्रोत्साहित करतात. असे दरणे सर संपूर्ण जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत.
आदरणीय प्रा. दरणे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
✍🏻- प्रफुल भोयर मुकुटबन


No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...