17 November 2024

प्रफुल्ल ची दिव्यांग मुलांसाठी अनमोल भेट....

 प्रफुल्ल ची दिव्यांग मुलांसाठी अनमोल भेट

वसंतराव नाईक अंध मूक बधिर व अपंग विद्यालयात साजरा केला वाढदिवस


        वाढदिवस प्रत्येकाचा आनंदाचा दिवस असतो. आपल्या वाढदिवशी इतरांचा आनंद वाढेल असा साजरा करणे हे सर्वांना शक्य नसते.  पण प्रफुल भोयर यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत मूकबधिर, मतिमंद, अंध, दिव्यांग मुलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेऊन वाढदिवस साजरा केला. 

            आपली समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस श्री. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग विद्यालय यवतमाळ येथे साजरा केला.

          यावेळी वसतीगृह अधीक्षक श्री. सीताराम राठोड, कु. वर्षा परिहार, वैभव घोलप तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रफुल यांनी विद्यालयाच्या कार्यालयाला भेट दिली. मुलांना खाऊ वाटप करुन प्रफुल यांनी सर्वांचे आभार मानून आशीर्वाद घेतला. याप्रसंगी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. बऱ्याचदा दिव्यांग व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जातं परंतु तेही माणूसच आहे त्यांच्या मनाला आनंद मिळावा यासाठी प्रफुल यांनी जपलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

       प्रफुल यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग विद्यालय यवतमाळ येथे राहूल हरसूले, संतोष बनारसे, यश चव्हाण, रोशन गवई, किशोर खुजे, श्री शेलोटकर,  प्रफुल पांगुळ, श्रीकांत आसावार, इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होता.


















No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...