17 November 2024

प्रफुल्ल ची दिव्यांग मुलांसाठी अनमोल भेट....

 प्रफुल्ल ची दिव्यांग मुलांसाठी अनमोल भेट

वसंतराव नाईक अंध मूक बधिर व अपंग विद्यालयात साजरा केला वाढदिवस


        वाढदिवस प्रत्येकाचा आनंदाचा दिवस असतो. आपल्या वाढदिवशी इतरांचा आनंद वाढेल असा साजरा करणे हे सर्वांना शक्य नसते.  पण प्रफुल भोयर यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत मूकबधिर, मतिमंद, अंध, दिव्यांग मुलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेऊन वाढदिवस साजरा केला. 

            आपली समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस श्री. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग विद्यालय यवतमाळ येथे साजरा केला.

          यावेळी वसतीगृह अधीक्षक श्री. सीताराम राठोड, कु. वर्षा परिहार, वैभव घोलप तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रफुल यांनी विद्यालयाच्या कार्यालयाला भेट दिली. मुलांना खाऊ वाटप करुन प्रफुल यांनी सर्वांचे आभार मानून आशीर्वाद घेतला. याप्रसंगी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. बऱ्याचदा दिव्यांग व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जातं परंतु तेही माणूसच आहे त्यांच्या मनाला आनंद मिळावा यासाठी प्रफुल यांनी जपलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

       प्रफुल यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग विद्यालय यवतमाळ येथे राहूल हरसूले, संतोष बनारसे, यश चव्हाण, रोशन गवई, किशोर खुजे, श्री शेलोटकर,  प्रफुल पांगुळ, श्रीकांत आसावार, इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होता.


















 सोईसुविधांचा अभाव असलेल्या झरीजामणी सारख्या तालुक्यातून आपल्या वकिलीच्या शिक्षणाकरिता यवतमाळ येथे आलेला नवतरुण जेव्हा गोरगरिबांना रक्त मिळावं याकरिता एक चळवळ उभी करतो. प्रामुख्याने या नवख्या तरुणाने रक्तदाना करिता सुरू केलेल्या चळवळीस लोक देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतात त्यावेळेस हा तरुण समस्त यवतमाळ करांच्या कौतुकास पात्र ठरणार हे अगदी स्वाभाविकच.

आणि याचाच प्रत्यय म्हणून या नव तरुणाचं कौतुक मा.राज्यपाल महोदय, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यवतमाळ व इतर अनेक महत्वपूर्ण व्यक्तींनी सुद्धा केलं आहे.

प्रफुल ही तुझी यवतमाळ जिल्ह्यापुरती मर्यादित असलेली रक्तदान चळवळ अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित व्हावी व तुझ्या कार्याला महाराष्ट्रभर बळकटी मिळावी याच तुला जन्मदिनी शुभेच्छा🎂💐💐

- विशाल बोरकर ( जिल्हा न्यायालय यवतमाळ )

12 November 2024

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त रॅली व शिबिराचे आयोजन...

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त रॅली व शिबिराचे आयोजन



यवतमाळ, दि.19 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश-२ ए.ए. लऊळकर होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ विधिज्ञ अमरचंद दर्डा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार तसेच मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी महाविद्यालय व महात्मा जोतीराव व सावित्रीबाई जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरा विधी स्वयंसेवक उपस्थित होते.

यावेळी न्या.लऊळकर यांनी दि. ११ ऑक्टोंबर १९८७ रोजी कायदेशिर सेवा प्राधिकरण कायदा जाहीर करण्यात आला होता व नोव्हेंबर १९९५ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. यामधुन समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना कायदेविषयक मदत पुरविण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामार्फत दि.९ नोव्हेंबर १९९५ पासुन राष्ट्रीय विधी सेवा दिनाची सुरूवात करण्यात आली, असे सांगितले. तसेच विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलणे सुध्दा तेवढेच आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सचिव के.ए. नहार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच मोफत विधी सेवा उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती दिली. राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ विधिज्ञ अमरचंद दर्डा यांनी राष्ट्रीय विधी सेवा दिन का साजरा केला जातो याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमानंतर रॅली काढण्यात आली. जिल्हा न्यायाधीश-२ ए. ए. लऊळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. रॅली मुख्य चौकातुन फिरत जिल्हा व सत्र न्यायालयात समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार उपमुख्य लोकअभिरक्षक हर्षवर्धन देशमुख यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने न्यायिक अधिकारी, वकील मंडळी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.


@District Court Yavatmal


 





मतदान जनजागृती घोषवाक्य....

कर्तव्याची लढाई लढण्या, गणराज्याची प्रबळ भरारी ।
ध्वज आकाशी उंच धरण्या , मतदानाची करा तयारी।।
                                         ✍🏻- प्रफुल भोयर


कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...