01 April 2024

तेज...

 तेज


आईसम माया करते
अभंग ठेवून नशिबाला
विश्वासाने मखमलणारे
पंख पसरवी भरारीला।।

प्रगल्भ झाली ज्ञानदेवता
श्रेष्ठत्वा ची दिशा मिळे
थेट पोचूनी नभशिखरावर
गुण रुपाचे अंतरंग खुले।।

तुझ्या कृपेने पहाट झाली
न्यायाची दरवाजे उघडली
सुख दुःखाच्या प्रकरणाची
क्षणात कोडे सुटली ।।

वीर धरेचे गात पोवाडे
स्वतंत्र केली भारत भु
मधुर स्वरांची मंत्रमुग्धता
सिद्धतेची पताका घेऊ ।।

तूच दाविली वाट उन्हाळी
मुक्त खगांची किलबिली
तुझ्या दर्शने सवाल सुटती
सुटली युगाची काहिली ।।

पुष्प वाहतो या चरणावर
तेज उसळुनी येतो
वर्षावाच्या सरी लाटेचा
थेंब प्राशुनी घेतो ।।
                            - प्रफुल भोयर
                                मुकुटबन

महाराष्ट्र च्या कलागुणांचा गौरव करणारी कविता....


No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...