01 October 2022

सर्व रक्तदात्यांना स्वैच्छिक रक्तदान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 



सर्व रक्तदात्यांना स्वैच्छिक रक्तदान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

          विचारांना कृतीची आणि कृतीला मेहनतीची साथ मिळाली तर या जगात कुठली गोष्ट अशक्य असेल असे मला वाटत नाही. प्रत्येकाला वाटत की आपण यशस्वी जीवन जगावं, इतरांसाठी प्रेरक ठरावं. पण जगणं तरी कुणाला सोपं गेलं. त्यात स्वतःला सिद्ध करण्यास किती आव्हान? प्रत्येकाला आयुष्यात सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागते. पण आपण आपल्या बरोबर इतरांना वेळ देतो यापेक्षा मोठी मदत कोणती असेल? असो. 

          आज १ ऑक्टोबर जागतिक रक्तदान दिन. सर्व रक्तदात्यांना स्वैच्छिक रक्तदान दिनाच्या शुभेच्छा! रक्त व रक्तदानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. अविभाज्य घटक असलेला रक्त गरजूंना आवश्यक वेळी दान दिल्याने दात्यांना कुठलाच अपाय नाही, त्यामुळे इच्छित सर्वांनी रक्तदान करा. इतरांना जीवनदान मिळेल. आणि त्यातच नाती जपणे फार महत्वाचे. दातृत्वाचा खरा अर्थ जाणणे गरजेचे आहे. दातृत्वाचा अर्थ जसा सामाजिक परंपरेतून आणि संस्कृतीतून पुढे आला. तसा तो आपण जाणणे गरजेचे आहे. दातृत्वाचे उत्तम उदाहरण म्हणून विश्वात्मक औदार्य हे पुस्तक खुप गाजल. विश्वात्मक औदार्य या पुस्तकाचे दिव्य यश आपण सर्वांनी याची डोळा याची देही बघितल. जगाला मानवतेचा संदेश देणारे पुस्तक सामाजिक तसेच शासन स्तरावर कौतुकास्पद बहुचर्चित ठरले. भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्वांचे आभार!

आज जागतिक रक्तदान दिनी रक्तदान जनजागृती साठी उचललेली सर्व पाऊले यशस्वी ठरवल्याबद्दल सर्व मित्रांचे पुनश्च आभार.


प्रफुल भोयर

लेखक : विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान

7057586468



No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...