प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा...
रक्तविर ठरतोय जीवनरक्षक
यवतमाळ: रक्तदाता आकाश जिवतोडे यांनी समाजाला रक्तदानाचा संदेश देत एका रुग्णाला जीवनदान दिले. कारण जीवनदान यासाठी की त्यांनी रक्तदान करून प्राण वाचविले आहे.
ना कुठला उत्सव ना कुठले औचित्य तरीही रक्तदाता यांनी स्वैच्छिक रक्तदान करून रुग्णाला सहानुभूतीपूर्वक दिलासा दिला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र रक्तविर बहुद्देशीय संस्थेची रक्तदान जनजागृती मोहीम आपली मुळे खोलवर रोवताना दिसत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अनेक नवीन रक्तदात्यांची रक्तदानाची इच्छा पूर्णत्वास येत आहे.
जनजागृतीला प्रतिसाद म्हणून रक्तदाते आकाश यांनी अपघातग्रस्त मधुकर डांगे यांच्यासाठी श्री वसंतराव नाईक शासकिय रक्तपेढी तेथे रक्तदान करून सर्वांना रक्तदानाचा संदेश दिला. या यशस्वी रक्तदानासाठी रक्तविरांना मोठे परिश्रम घ्यावे लागले. यावेळी आकाश जीवतोडे, प्रफुल भोयर तसेच मित्रमंडळ यांचे मोलाचे योगदान लाभले. यांचे रुग्णनातेवाईकांनी आभार मानले.