19 April 2022

चिमुकल्यांचा शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न...

चिमुकल्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न◆ दाखलपात्र बालकांचा शिक्षणोत्सव झरी तालुक्यातील येदलापुर अंगणवाडी व जिल्हापरिषद शाळा यांचा संयुक्तपणे शाळा पूर्व तयारी मेळावा आज शाळेच्या प्रांगनात संपन्न झाला. इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज येदलापूर येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उदघाटन शाळाव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तथा ग्राम प्रशासन यांच्याहस्ते झाले.       यावेळी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक तसेच भाषाविषयक विकास होण्यासाठी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले. त्या नुसार उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्तपणे मेळाव्याची सुरुवात झाली. बालकांतील कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कलाकुसर मेळाव्यात ठेवण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. चाटे सर यांनी मेळाव्याची संकल्पना स्पष्ट केली. तर अंगणवाडी सेविका श्रीमती भोयर यांनी बारकाव्यातून बाळांचा सर्वांगीण विकास कसा साधाता येतो, या विषयी सूक्ष्म मार्गदर्शन केलं. यावेळी शाळेतील मुलांचा आनंद मेळावा उत्साहात पार पडला.  यामुळे चिमुकल्याचा उत्साह द्विगुणित झाला. समाजातील व्यवहार कसे चालतात या विषयी  मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. 



















No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...