27 February 2022

प्लस पोलिओ मोहीम....

 


प्लस पोलिओ मोहीम - 2022
#स्वयंसेवक
#PrafulBhoyar #Bravery_Raktveer






23 February 2022

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा सप्ताह...

 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा सप्ताह...

◆ मातृभाषा आमुची मराठी

°°°° मराठीची महती °°°°°


ओळखीची वाट जाते

अंतराच्या मंदिरी।

स्नेह हा मग दाटतो

अन वाजती पावरी।।


सूर गुंतता स्वरांना

निर्मिली माळ ती।

जन्मांतरीच्या बंधाची

बांधली नाळ ही।।


स्वरांचे तेज गुंजता

मृत्तिका गंधाळली।

प्रार्थनेचे गूढ ऐकता

नवप्रभा ही जाहली।।


मुग्ध करती मन हे

अन मुग्ध झाली काया।

मराठीच्या थोरविला

मराठीची माया।।


अभिमाने सांगतो मी

मराठीचा बाणा।

सार्थ ठरली महती 

अन ताठ झाला कणा।।


          रचना:-प्रफुल भोयर

                     मुकुटबन


संकल्पना

प्रफुल भोयर 

रक्तविर बहुउद्देशिय संस्था

21 February 2022

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा सप्ताह...

 


मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा सप्ताह...

◆ मातृभाषा आमुची मराठी

●● जीवन ●●

मिथकांना घेऊन जगताना
ते असते मराठीचं पाहिलं पाऊल
वसंताची तृप्त चाहूल
तरुसम छाया पाखरांची माया
सोसताना चटके बापासारखी कणखर
हृदयाला नाही विसावा क्षणभर
रानमेवा न्याहाळताना झऱ्यांचा खळखळ
सुजल-सुफल समृद्धीची भरभर
प्रयत्नरत पंखांची फडफड
पाण्याविण माशांची तडफड
संकष्टात पाठीराखा भाऊ असते जीवन
जाईचा वास स्पंदनाचा श्वास
आईची ममता घटनेची समता
अभिव्यक्तीच्या धाग्याने बांधलेली
न्यायाची हाक असते जीवन
हजार यातनांतून जगण्याची
आस असते जीवन
नभांगणी भरारी घेताना
आयुष्याचा व्यास असते जीवन
काव्याच्या सुराने पेटलेला
क्रांतीचा वणवा असते जीवन
उत्कर्षाची संघर्षमय लढाई असते जीवन

✍🏻 प्रफुल भोयर ( मुकुटबन )
रक्तविर बहुउद्देशिय संस्था
7057586468

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा सप्ताह...


◆◆ मातृभाषा आमुची मराठी ◆◆

          भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. आज २१ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात शांतता व बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी सण २००० पासून हा दिवस साजरा करण्यात येतो.

         आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात प्रत्येक राज्याची स्वतःची विशिष्ट अशी भाषा पाहायला मिळते. 

         बोलण्यासाठी, एकमेकांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. भाषा नसती तर आपण सर्वजण अबोल राहिलो असतो. त्यामुळे आपल्या जीवनात भाषेला खूप महत्वाचे स्थान आहे. 

          महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. अमृताहूनी गोड मराठी भाषा असा उल्लेख अनेक अंगाने केलेला आपल्याला पहायला मिळतो. मराठी भाषेत विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे भाषेचे संवर्धन होताना दिसते. 

         माणसाच्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा अथवा प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा होय. 

          एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याच्या भाषेवरून ठरवले जाते. व्यक्तीला योग्य दर्जा देण्यासाठी मातृभाषा योग्य भूमिका बजावत असते. 

          आपल्या सभोवतालचा विकास व्हावा असे वाटत असेल तर आपल्या मातृभाषेचा विकास करणे खूप गरजेचे आहे. 

          २७फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 

          कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.

          त्यानिमित्त २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ते 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन दरम्यान  मातृभाषा आमुची मराठी हा मराठी भाषा सप्ताह राबविण्यात येत आहे.


संकल्पना

प्रफुल भोयर - मुकुटबन

रक्तविर बहुउद्देशिय संस्था यवतमाळ

७०५७५८६४६८

16 February 2022

जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी आणि युवकांनी दिला श्रमदानाचा संदेश...


युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार तसेच नेहरू युवा केंद्र यवतमाळ मार्फत आज तालुक्यातील जामनी येथे श्रमदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी आणि युवकांनी श्रमदानाचा संदेश दिला...

🌱❤️✨

प्रफुल भोयर (मुकुटबन)✨



जामणी येथील जिल्हा परिषद शाळेत श्रमदान जनजागृती अभियान

◆ जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांसह युवकांनी दिला समाजासाठी संदेश 

           

          नेहरू युवा केंद्र यवतमाळ कडून झरी तालुक्यातील गावस्तरावर प्रत्येक गावात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने झरी तालुक्यातील जामणी येथील जिल्हा परिषद    उच्च प्राथमिक शाळेत श्रमदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. 

          गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन श्रमदान करण्याची गरज आहे. श्रमदानातुन गावास स्वच्छ, सुंदर आणि स्वयंपूर्ण करता येते. हा संदेश गावागावात पोहोचावा आणि आचरणात यावा, यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामणी येथील चिमुकल्यांसह युवकांनी श्रमदानाचा संदेश दिला.

      आपल्या निरागसतेतून युवकांना मेहनत, चिकाटी आणि जिद्दीची साथ लाभली तर मनात येईल ते काम साध्य करता येते हा विश्वास शाळेतील मुलांनी जागविला.

       यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. मडावी सर, मेश्राम सर, अक्कलवार मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे राहुल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते निखिल वनकर, विनोद मेश्राम, श्रीकांत पाबतवार, गुलाब लेनगुळे, बाळकृष्ण भोयर, दिनेश वडस्कर, बाळू टेकाम आणि बरेच युवक उपस्थित होते. नेहरू युवा केंद्र आणि समाज या विषयावर यावेळी चर्चा केली. सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान केल्यास गावाचा विकास निश्चित आहेत. असे विचार चर्चसत्रात उपस्थितांनी मांडले शाळेच्या विकासासाठी आम्ही सदैव अग्रेसर राहू, असे विचार यावेळी मुख्याध्यापक सर यांनी व्यक्त केले. तरुणांसाठी आपण एकीने प्रयत्न करत आहो आणि पुढेही करू, असा विश्वास गाव युवा मंडळाचे अध्यक्ष निखिल वनकर यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम आणि अनिल ढेंगे सर यांच्या मार्गदर्शनात  प्रफुल भोयर यांनी केलं. तर प्रास्ताविक आणि आभार नेहरू युवा केंद्र यवतमाळ च्या राष्ट्रीय स्वयंसेवक कु. प्रविणा भोयर यांनी मानले.


फोटो:- जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांसह युवकांनी दिला श्रमदानाचा संदेश


 


 






 







13 February 2022

अभिनंदन प्रणिता ताई - आठवणी आकाशवाणीच्या / आकाशवाणी केंद्र पुणे नी घेतलेली तुझी दखल वाचून अत्यानंद होत आहे. पुन्हा एकदा अभिनंदन...

 


अभिनंदन प्रणिता ताई....✨
आकाशवाणी केंद्र पुणे नी घेतलेली तुझी दखल वाचून अत्यानंद होत आहे. पुन्हा एकदा अभिनंदन✨🎉💐💐☺️
Thanks To Akashvani Pune
आठवणी आकाशवाणीच्या  आकाशवाणी पुणे ✨📻

12 February 2022

मानवतेचं प्रतिबिंब उमटवणारे दान म्हणजे रक्तदान...

 




 मानवतेचं प्रतिबिंब उमटवणारे दान म्हणजे रक्तदान...!

रक्तदाते :- यशवंत गिरी O+ ( यवतमाळ पोलिस )














11 February 2022

आत्मविश्वास मनुष्याला कणखर बनवतो आणि विश्वास नातं घट्ट बनवतो....!


आत्मविश्वास मनुष्याला कणखर बनवतो आणि विश्वास नातं घट्ट बनवतो....!

#Bravery_Raktveer 😊

💯✨✌🏻🖤

05 February 2022

रक्ताचं नात जोडणारे रक्तमहर्षी-राम बांगड सर

 रक्ताचं नात जोडणारे रक्तमहर्षी-राम बांगड सर


           महाराष्ट्राचे रक्तमहर्षी असा ज्यांचा गौरव केला जातो असे साक्षात मानवतेचे प्रतिबिंब अशी ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे ते म्हणजे श्री. राम बांगड सर. आपल्या हातून मानवतेसाठी सेवा घडावी म्हणून झटणारे जीवनदाते . ज्यांनी आपल्या आयुष्याचा काळ रक्तदानातून रुग्णजीव वाचविण्यात घालवला आणि रक्ताच्या नात्याचं एक मजबूत वलय निर्माण केलं.

         विश्वपटलावर मानवतेला विशेष स्थान आहे. माणुसकी जपणे जसे घरपण टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचे आहे त्याप्रमाणेच माणुसकी ही सामाजिक जाणिवा जोपाण्यासाठीही तितकीच महत्वाची आहे.

         राम बांगड सर यांनी आपल्या स्वतःतील सहनशीलतेला सामर्थ्य बनवलं आणि एक अनोखी रक्ताची चळवळ उभारली. रक्ताचे नाते ट्रस्ट या नावाने ती नावारुपास आणली. ज्यामुळे महाराष्ट्रातील हजारो लोकांना रक्तासाठी होणारी वणवण संपली. सुरक्षित रक्त आणि रक्तदाते उपलब्ध करून ते अनेकांचे प्राण आपल्या कार्यातून वाचवीत आहे. कुणाला कुठेही रक्ताची गरज भासल्यास ते ती पूर्ण करतात. कमालीची दातृत्वशक्ती त्यांच्याकडे आहे. माझ्या सारख्या असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या रक्तमहर्षी राम बांगड सर यांचा आज वाढदिवस.

           त्यानिमित्ताने रक्ताचे नाते ट्रस्ट चे कार्य तळागाळातील सर्वांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या यशस्वी प्रयत्नांना भरभरून यश लाभो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

          आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आदरणीय श्री. राम बांगड सर... 🎂🎂💐💐

शब्दांकन/शुभेच्छुक :- प्रफुल भोयर ( यवतमाळ ) -७०५७५८६४६८



01 February 2022

◆ जिल्हा स्तरीय लोक सांस्कृतिक महोत्सव नेहरु युवा केंद्र यवतमाळ तर्फे आयोजित....

 

◆ जिल्हा स्तरीय लोक सांस्कृतिक महोत्सव ◆

● नेहरु युवा केंद्र यवतमाळ तर्फे आयोजित....






















































































कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...