राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय झरी येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
◆ युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा ठरतात महत्वाच्या
युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या ठरतात.
या अनुषंगाने नेहरू युवा केंद्र व युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय व राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विध्यमाने "देश भक्ती आणि राष्ट्र निर्माण" या विषयाला अनुसरून 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास' या विषयावर तालुका स्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यावर राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय झरी येथे नेहरू युवा केंद्र यवतमाळ तर्फे तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शुभम विलास राऊत द्वितीय सांची तेलतुंबडे आणि तृतीय क्रमांक सुयश तोटेवर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे विठ्ठल पाईलवार सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. तर प्रास्ताविक प्रा.. पोलचेट्टीवार सर यांनी केले. प्रा. फाळके सर यांनी सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. तर आभार प्रदर्शन नेहरू युवा केंद्राच्या युवा स्वयंसेविका कु. प्रविणा भोयर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी . प्रेम नरडलवार सर, कापनवार सर, पिंगे सर, विपीन पाईलवार सर, मंगेश मडावी यांनी मोलाचे सहकार्य केले.
युवकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रप्रेम जागृत व्हावं, आत्मपरिक्षणातून युवकांचा विकास व्हावा. युवकांनी भविष्याची योग्य वाट चोखाळावी आणि आपले ध्येय गाठावे. याविषयी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सखोल मार्गदर्शन केलं. स्वयंसेविका कु. प्रविणा भोयर, प्रफुल भोयर तसेच युवक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment