24 December 2021

जपणूक जागतिक वारसा स्थळांची...

जपणूक जागतिक वारसा स्थळांची

  ◆ सामाजिक जबाबदारी - आपली


      नमस्कार राजेहो ! काय म्हणता ? कसे आहेत सर्वजण ? मजेत ना ! मी बी मजेत आहे !
     मला न आज तुम्हाला लईच खास गोष्ट सांगायची आहे.  राजे हो ! हल्लीच्या काळात पर्यटनाला आलेल्यांची तुफान गर्दी दिसते. निसर्गप्रेमी,  निसर्ग अभ्यासक अशी सर्वांचीच हजेरी राहते. राजेहो ! मजाच मजा नाही का ?
     जगात अनेक वारसा स्थळं आहे राजेहो. त्यातच भारतामध्ये सर्वाधिक वारसा स्थळ आहे. अन त्याला निसर्गाची साथ म्हणजेच आसमंताला भिडणारे भले - भले डोंगर, दऱ्या - खोऱ्या अन समुद्राचं - नद्यांचं निळशार पाणी, लईच झकास दिसते राजेहो ! पण गेल्या काही वर्षांपासून या सौंदर्याला नजरच लागली आहे जणू ! लोकांनी बेसुमार वृक्षतोड केली, अतिक्रमण केली, शिकारीचे प्रमाण वाढवले. जो-तो पर्यटनाला येतो अन दगडाने त्या भिंत्यांवर आपले नाव लिहून ठेवतो. त्यामुळे त्यांचं सौंदर्य कमी होत आहे. वनस्पती व प्राण्यांच्या कित्येक प्रजाती नष्ट होत आहे. 
     "राजेहो  जागतिक वारसा म्हणजे काय" ? तर ज्या स्थळांना, वास्तुंना सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आहे. ही स्थळे देशाचा मौल्यवान खजिना आहे. त्यासमान दुसरी वास्तू तयार करणे कठीणचं.
         राजेहो ! म्हणूनच या प्राचिन इतिहासाच्या परंपरेच्या पाऊलखुणा जपुयात. तो जतन करणे, त्यांचे रक्षण करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे .

चला आपला वारसा जतन करण्याचा वसा घेऊया.

देशाच्या नाव-लौकिकात भर घालुया, 
ठेवा वसुंधरेचा जपुन ठेवू या ।।

          शब्दांकन:- प्रफुल्ल भोयर यवतमाळ/ ७०५७५८६४६८

◆  आकाशवाणी कार्यक्रम "राजेहो" यामध्ये प्रसारीत...

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...