25 July 2021

प्रफुल भोयर यांची कविता कविसंमेलनात सादर...


प्रफुल भोयर यांच्या कवितेचे कवी संमेलनात सादरीकरण



       यवतमाळ साहित्य मंच च्या वतीने घेण्यात आलेल्या श्रावणातील शब्दसरी काव्यसंमेलन दुसरे यामध्ये 'सुखाची सावली' या कवितेचे प्रफुल भोयर यांनी सादरीकरण केले. यवतमाळ येथील प्रयासवन येथे झालेल्या कवी संमेलनात प्रफुल सहभागी झाले होते. 


स्वतःसाठी रोजच जगतो

जगून पाहू दुसऱ्यांसाठी ।

स्वार्थ मोहाच्या पसाऱ्यात 

त्याग करु इतरांसाठी ।।

          व्यस्त जीवनात आपल्यातून बाहेर निघून  सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून इतरांसाठी त्याग करु, हा संदेश देणारी कविता त्यांनी सादर केली.

          यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष अमर पवार, माजी संमेलनाध्यक्ष गुलाब सोनोने व प्रमुख पाहुणे विजय देशमुख सर उपस्थित होते. आपल्या बहारदार काव्याने प्रेक्षकांची मने जिंकल्याने त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील नामांकित, प्रसिद्ध कवी उपस्थित होते. पहिल्या वर्षी झालेल्या कवीसंमेलनात त्यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण केले होते.


#तरुण भारत...

https://www.tarunbharat.net/Encyc/2021/7/29/Praful-Bhoyar-s-poem-presented-at-the-poets-convention.html















No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...