मा. आमदार श्री. बोदकुरवार यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा सत्कार...
कृषिदिनाचे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राजेश पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सामाजिक कार्यात विशेष योगदान देणार्या देशभक्त समाज सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन होईल ती मदत करणारे प्रफुल भोयर उपस्थित होते. यावेळी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा शाल, शिल्ड आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार बोदकुरवार यांनी प्रफुल च्या कार्याचे कौतुक केले. प्रफुल भोयर हे रक्तदान क्षेत्रात काम करतात. यापूर्वी ते अनेक पुरस्काराने सन्मानित आहे. त्यांच्या दररोजच्या कार्यामुळे कित्येक गरजूंचे जिव वाचतात यातून तरुणांना प्रेरणा मिळते.
प्रफुल भोयर हे म्हणेन तेव्हा मागेल तिथे रक्तसंबंधीत रुग्णांसाठी वेळेत रक्तदाता उपलब्ध करून देतो, समाजातल्या तरुणांना एक विशिष्ट शृंखलेत बांधून हवे तेव्हा रक्तदानासाठी तयार करणे, याला आत्मिक कौशल्य पाहिजे. त्या कौशल्यातुन प्रफुल भोयर यांनी केलेले कार्य मानवतेच्या हिताचे सर्वोच्च कार्य आहे. या कार्याची दखल घेत छत्रपती प्रतिष्ठान बोटोनीचे राजेश पांडे यांनी प्रफुल भोयर यांना सत्कारासाठी निमंत्रित केले होते.
#Bravery_Raktveer 😊
सत्काराच्या रूपाने रक्तदान क्षेत्रातील बहुमोल कार्याचा मा. आमदार साहेबांनी केलेल्या
गौरवाला वृत्तपत्रात जागा दिली व बातमीला रक्तदात्या तरुणांसाठी प्रेरक ठरवली. त्याबद्दल सर्व वृत्तपत्रांचे मनस्वी आभार!
देशोन्नती, लोकशाही वार्ता, दैनिक विदर्भ मतदार, नवराष्ट्र, सुपर भारत , वणी बहुगुणी यांना मनापासून धन्यवाद!
#Bravery_Raktveer 😊
https://www.facebook.com/100012958780815/posts/1221909581584323/?app=fbl
No comments:
Post a Comment