विदर्भ युवक मित्रमंडळ टीम व रामनवमी आयोजक समिती तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
15 नोव्हेंबर - मुकुटबन येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त सरस्वती बालविद्या मंदिर येथे बुधवारी VYM Blood Network Organization व रामनवमी आयोजक समिती च्या कार्यकर्त्यांनी गरजू,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन, कलर पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच ज्युनिअर कॉलेजच्या विध्यार्थ्यांनसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
समाज सेवेचे उद्धिष्ट पुढे ठेऊन या सेवाभावी संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे सर व ईतर शिक्षक वृंद हजर होते. तसेच गणेश मुद्दमवार, प्रफुल भोयर,अजय बाज्जलावार, अतुल विधाते, हेमंत गेडाम,जयंत उदकवार, केतन ठाकरे , राजू कांबळे, चेतन म्याकलवार, आदित्य बरशेट्टीवार, योगेश बच्चेवार,संकेश नामपेल्लीवार व VYM टीम चे कार्यकर्ते आणि रामनवमी आयोजक समिती चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
DAINIK SAKAL YAVATMAL |