◆ विधी महाविद्यालयात प्रथम ध्यान दिन साजरा
यवतमाळ:- संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी व जागतीक ध्यान दिवस निमित्त स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रथम ध्यान दिन साजरा करण्यात आला. डॉ. स्वप्नील सगणे सर, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक चेतना साईकर, डॉ. श्याम गाडवे, डॉ. मिनाक्षी गाडवे , ॲड. राजश्री ठाकरे यांच्या माध्यमातून ध्यानाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
सध्याच्या धावपळीच्या युगात मनाला शांत ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी योगा सोबत ध्यानाचा सराव महत्वाचा ठरत आहे. मनाला प्रशिक्षित करण्यासाठी मानसिक स्पष्टता, भावनिक शांतता आणि शारीरिक विश्रांतीची स्थिती प्राप्त करण्यासाठी, सजगता, लक्ष केंद्रित किंवा एकाग्र विचार यासाठी ध्यान या तंत्राचा वापर महत्वाचा ठरतो. ध्यानामुळे ताण कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होते, झोपेची गुणवत्ता सुधारते, लक्ष केंद्रित होऊन ऊर्जा मिळते. ध्यानाचे महत्व विद्यार्थ्यांना कळुन शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित होऊन परीक्षेच्या काळात मन शांत राहण्यासाठी ध्यान फायद्याचे आहे असे सांगून यावेळी ध्यानाचे महत्व उपस्थितांना अवगत करुन दिले.
या प्रसंगी स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत सर, डॉ. स्वप्नील सगणे सर, डॉ. संदीप नगराळे सर, डॉ. वैशाली फाळे मॅडम, प्रा.अंजली दिवाकर मॅडम, प्रा. वंदना पसारी मॅडम, प्रा. पल्लवी हांडे मॅडम, प्रा. अमिता मुंदडा मॅडम, प्रा. योगिता बोरा मॅडम, प्रा. अक्षिता जयस्वाल मॅडम, डॉ.शंतनू कनाके, प्रा. मृणाल काटोलकर मॅडम तसेच विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment