"विधी स्वयंसेवक पोहचले शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात परत आणण्यासाठी"
यवतमाळ:- आज दिनांक १ ऑगस्ट २०२४ सकाळी झोपडपट्टी भागात जावुन शाळा सोडलेल्या मुलांना परत शाळेत आणण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
ज्यांनी कोणत्याही औपचारिक शिक्षण व्यवस्थेत नोंदणी केलेली नाही, ज्यांनी शाळा सोडली आहे किंवा कधीही शाळेत प्रवेश घेतलेला नाही. अशा शाळाबाह्य मुलांचा प्रश्न सार्वजनिक शिक्षण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आव्हान उभी करतो. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
विधी स्वयंसेवक अशा विद्यार्थ्यांना यवतमाळ शहरातील आजूबाजूच्या झोपडपट्टी भागात जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मोफत शिक्षण पर्याय उपलब्ध असल्याची माहिती देऊन शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्व पटवून देण्यात आले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुनोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली विधी स्वयंसेवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment