18 August 2024

यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव....

 

यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव...

रक्तदानाच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी दिला पहिला सामाजिक पुरस्कार

        यवतमाळ जिल्हा साहित्य अकॅडमी यवतमाळ द्वारा आयोजित वऱ्हाडी कवी स्व. सुहास राऊत व जेष्ठ कवी स्व. अशोक मारावार यांच्या स्मृति प्रित्यर्थ यवतमाळ येथे दुसरे साहित्य संमेलन सहकार भवन यवतमाळ येथे पार पडले. सदर संमेलनाच्या समारोपीय प्रसंगी रक्तविर बहुउद्देशिय संस्था यवतमाळ चे सचिव श्री. प्रफुल गणपत भोयर यांना त्यांच्या रक्तदान क्षेत्रातील बहुमोल कार्याबद्दल गौरविण्यात आले. प्रफुल्ल यांनी आजपर्यंत विविध मार्गांने गरजु गरिब रुग्णाला मोफत रक्तपुरवठा करून जिवनदान दिले. त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी यवतमाळ साहित्य मंच तर्फे शाल, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यवतमाळ जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयातील रुग्णाना सर्वतोपरी रक्ताची मोफत मदत करणे, मोफत रक्तदाते पुरवणे, सर्वसमावेशक जनजागृती करुन सर्वदुर रक्तदानाचा मोफत प्रचार व प्रसार करणे, इत्यादी समाजोपयोगी कार्य करण्यास प्रफुल्ल प्राधान्य देतो. कुठल्याही मोबदल्या शिवाय निस्वार्थपणे गरजुंना मदत करणे आणि त्यासाठी आपले आयुष्य खर्च करणे यासाठी मोठा त्याग करावा लागतो. त्यासाठी मेहनत आणि बुध्दिमत्तेचा वापर करावा लागतो, हे सर्व कुशलतेने करुन प्रफुल्ल यांनी कमी वयात समाज जनजागृतीचा मोठा पल्ला गाठला आहे. त्यानिमित्त यवतमाळ जिल्हा साहित्य मंच ने दखल घेऊन प्रफुल्लच्या कार्याचा गौरव केला आहे. 
            प्रफुल्ल भोयर यांच्या निरीक्षण शैलीतून तयार झालेली अप्रतिम सर्जनशील प्रतिकृती म्हणून जिल्ह्यात लौकिक मिळालेले सामाजिक पुस्तक विश्वात्मक औदार्य रक्तपेढी एक वरदान यास मोठे यश लाभले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणा स्थान म्हणून प्रफुल यांचे कडे पाहिले जाते. एका साहित्य अकॅडमीने समाजसेवकांचा सन्मान करणे ही संकल्पना खुप व्यापक आणि प्रशंसनीय आहे, असे मत यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष यांनी व्यक्त केले.

          याप्रसंगी व्यासपिठावर अध्यक्ष मा. श्री. नितिन खर्चे यवतमाळ अर्बन को-आँपरेटिव्ह बॅंक यवतमाळ तसेच संमेलनाध्यक्ष गझलगंधर्व मा. श्री. सुधाकर कदम, माजी संमेलनाध्यक्ष मा. श्री. मिर्झा रफी अहेमद बेग, मा. श्री. महेश सोनेकर अध्यक्ष यवतमाळ जि. प. कर्म. सह. पतसंस्था, यवतमाळ, श्री. राजु पडगिलवार, श्री. नितिन पखाले जेष्ठ पत्रकार, श्री. अजय म्हैसाळकर, श्री. यशवंत पाटील चैतन्य नागरी पतसंस्था, यवतमाळ उपस्थित होते.











01 August 2024

"विधी स्वयंसेवक पोहचले शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात परत आणण्यासाठी"



         "विधी स्वयंसेवक पोहचले शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात परत आणण्यासाठी"


यवतमाळ:- आज दिनांक १ ऑगस्ट २०२४ सकाळी झोपडपट्टी भागात जावुन शाळा सोडलेल्या मुलांना परत शाळेत आणण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

      ज्यांनी कोणत्याही औपचारिक शिक्षण व्यवस्थेत नोंदणी केलेली नाही, ज्यांनी शाळा सोडली आहे किंवा कधीही शाळेत प्रवेश घेतलेला नाही.  अशा शाळाबाह्य मुलांचा प्रश्न सार्वजनिक शिक्षण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आव्हान उभी करतो. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

      विधी स्वयंसेवक अशा विद्यार्थ्यांना यवतमाळ शहरातील आजूबाजूच्या झोपडपट्टी भागात जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मोफत शिक्षण पर्याय उपलब्ध असल्याची माहिती देऊन शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्व पटवून देण्यात आले.

      यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुनोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली विधी स्वयंसेवक उपस्थित होते.








कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...