02 July 2024

जवाहरलालजी दर्डा जयंती निमित्ताने अमोलकचंद विधी महाविद्यालयात 101 वृक्षलागवड

 जवाहरलालजी दर्डा जयंती निमित्ताने अमोलकचंद विधी महाविद्यालयात 101 वृक्षलागवड



यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ चे संस्थापक सदस्य तथा स्वतंत्रता सेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांची एकशे एक वी जयंती अमोलकचंद विधी महाविद्यालयामध्ये वृक्ष लागवड करून साजरी करण्यात आली.

          विधी महाविद्यालयामधे बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाविद्यालय परिसर तथा परीसराबाहेर असे एकशे एक रोपे लावण्यात आली.

          यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासाचे महामेरू ठरलेले स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांना अभिवादनपर कार्यक्रम विधी महाविद्यालयात 2 जुलै ला सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

          यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्या प्रसारक मंडळ चे सहसचिव अॕड. महेंद्र ओसवाल, सदस्य अॕड. ए.पी. दर्डा, अॕड. आर. के. मनक्षे, बाळासाहेब मांगुळकर, देविदास गोपलानी, देवकिसन शर्मा,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ . संदीप नगराळे, त्याचप्रमाणे डॉ. वैशाली फाळे, डॉ. स्वप्नील सगणे, डॉ. नितीन कोथळे, प्रा. वंदना पसारी, प्रा. योगीता बोरा, प्रा. अमिता मुंधडा, अॕड.सोनाली भोयर, अॕड. रुपाली डिडवानीया, डॉ. सुमीता आडे, स्वाती ठाकरे ईत्यादी शिक्षक तसेच अजय दर्डा, मनोज गौरखेडे, विशाल वानखेडे, राजेश राठोड, सतिश कदम, राजू कुमरे, गणपत चितार्लेवार शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे सचिव सी.ए. प्रकाश चोपडा यांचे मार्गदर्शनात सदर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.










No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...