संविधानाला अभिप्रेत असलेला समाज बनवणं, ही विद्यार्थ्यांची जबाबदारी
अमोलकचंद विधी महाविद्यालयात 'ईन्वेस्ट ईन विमेन : एक्सलेरेट प्रोग्रेस' परिषद संपन्न
अमोलकचंद विधी महाविद्यालय यवतमाळ तसेच अभिषेक मेमोरीयल फाउंडेशन यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने "ईन्वेस्ट ईन विमेन : एक्सलेरेट प्रोग्रेस" या विषयावर एक दिवशीय परीषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी परिषदेचे उदघाटन प्राचार्य डॉ. विजेश मुणोत सर, अभिषेक मेमोरीयल फाउंडेशन च्या सचिव डॉ. सुप्रभा यादगिरवार मॅडम, यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. संदीप नगराळे सर, प्रा. अंजली दिवाकर मॅडम, डॉ. फाळे मॅडम उपस्थित होत्या.
परिषदेच्या प्रथम सत्रात मार्गदर्शन करतांना डॉ. यादगिरवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांमधे संशोधन वृत्ती निर्माण होणेसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच भविष्यात संशोधनवृत्तीचा फायदा वकिली करतांना, न्यायाधीश म्हणून तसेच ईतर क्षेत्रात सुध्दा होईल, अशी संशोधनातील व्यापकता दर्शवली. Gender Sensitivity समजून घेतली तर समाजात Gender Equality प्रस्थापित होऊ शकते, असे भक्कम मत मांडले. यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण देऊन विषयाची क्लिष्टता कमी केली. एकंदरीत डॉ. यादगीरवार मॅडम यांनी भारतीय न्यायव्यवस्थेचा चेहरा विधीच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवत विद्यार्थ्यांना प्रगतीच्या वाटा दाखविल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. विजेश मुणोत सर म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संशोधनात्मक कृती करावी तसेच शिक्षकांनीही आपले संशोधनात्मक लिखाण वाढवावे या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला असुन रोख रकमेची अनेक बक्षीसे ठेवल्याचे सांगितले. या परिषदेत सक्रिय सहभाग नोंदविलेल्या सर्वांचे भरभरून कौतुक करत कॉलेज मधून प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत असल्याचा दाखला दिला.
आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. संदीप नगराळे सर आपल्या प्रास्तविकेत म्हणाले कि, यानंतर हा उपक्रम महाविद्यालयापुरता सिमीत न ठेवता राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार असल्याची भुमीका मांडली. सदर कार्यक्रमाचे संचलन प्रा. बोरा मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. दिवाकर मॅडम यांनी केले.
"ईन्वेस्ट ईन विमेन : एक्सलेरेट प्रोग्रेस" या एक दिवसीय परिषदेच्या द्वितीय सत्रांत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनपर लेखांचे सादरीकरण केले. परीक्षकांच्या अंतिम निर्णयानंतर कु. संतोषी आगरकर, प्रफुल्ल भोयर, शाम भोयर यांना उत्कृष्ट पेपर लिखाण करिता रोख रक्कम पारितोषिक तसेच अनुक्रमे प्रा. योगिता बोरा, ओंकार बॅनर्जी, डॉ. सुमिता आडे यांना उत्कृष्ठ पेपर सादरीकरण करिता रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून डॉ. सगणे सर आणि डॉ. फाळे मॅडम यांनी कामकाज पाहीले.
यावेळी प्रा.वंदना पसारी, प्रा. अमिता मुंधडा, प्रा. नलीनी आडे, प्रा. पल्लवी हांडे, डॉ. सुचिता ढेरे, डॉ. सुमीता आडे, कविता आगरकर, स्वाती ठाकरे, राजश्री ठाकरे आदी शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने कायद्याचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
माननीय प्राचार्य मुनोत सर यांचे हस्ते सन्मान... |