◆ माणुसकी जप 💫
15 July 2022
"माणुसकी जप"
07 July 2022
05 July 2022
करा रक्तदान।। मिळेल जीवनदान।।
करा रक्तदान।। मिळेल जीवनदान।।
तालुक्यातील सर्व युवकांना रक्तविर बहुउद्देशीय संस्था, मुकुटबन कडून आवाहन करण्यात येते की, तालुका प्रशासन झरी (जामनी) तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सामाजिक बांधिलकीतुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 6 जुलै 2022 रोजी करण्यात आले आहे.
तरी उद्या होणाऱ्या रक्तदान शिबिरास स्वयंस्फूर्तीने तयार होऊन रक्तदान करावे.
दिनांक: 6 जुलै, 2022
स्थळ: तहसील कार्यालय सभागृह, झरी (जामनी)
प्रफुल भोयर
रक्तविर बहुउद्देशिय संस्था, मुकुटबन
7057586468
"विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान" |
01 July 2022
आपणास वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा मॅडम...
आपणास वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा मॅडम💐💐
माननीय भगत मॅडम हे नाव झरी प्रकल्पात आदराने घेतल्या जाते. कारण मॅडम नी येथील सर्वांप्रती सुरुवातीपासूनच जिव्हाळा जपलाय. सर्व अंगणवाडी ताईंना आपुलकीची, ममतेची सावली दिली.
झरीची ओळख आजही आदिवासी आणि दुर्गम भाग म्हणून केल्या जाते. महिलांच्या बाबतीत अनेक अंधश्रध्दा आजही पाळत असल्याचं कधीकधी जाणवते. या भागात बऱ्याच प्रमाणात महिला व बालकांमध्ये कुपोषण दिसून येते. या संवेदनशील वर्गात ज्ञानाच्या अभावाने विविध गैरसमज पसरले आहेत. त्यातून आपली काळजी कशी घेतात, हेही माहीत नसलेली लोक आढळतात.
अशा भागात अंगणवाडी सेविकांच्या मार्फत प्रत्येक घरापर्यंत जाऊन माता व बालकांचे कुपोषण संपवणे, त्यांची काळजी घेणे, योग्य वेळी योग्य सल्ला देणे इत्यादी महत्वाची व समाजोपयोगी कामे मॅडम करतात.
CDPO Officer म्हणून मॅडमनी गेल्या काही वर्षात केलेली कामे उल्लेखनीय आहे. ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके आणि
महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्यापर्यंत सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणे आणि त्यांच्या आरोग्याचा स्तर सुधारणे, ग्रामीण भागातील बालकांचे कुपोषणापासून रक्षण करणे, ही महत्त्वाची कामे पार पाडली.
असे म्हणतात, वात्सल्याची जिवंत मूर्ती म्हणजे आई असते. सर्वजण आईची महती जाणतात.
ज्या प्रेरणेतून उत्साहाने तुम्ही काम करता त्यामुळे खरच सर्वांना याचा फायदा होत आहेच. शिवाय अनेक कुपोषितांचे जीवनमान सुधारलेत. एकंदरीत या सर्व कार्यामुळे थोरत्व जागृत झालेली आई मला तुमच्यात दिसते. स्नेहाने कार्यतत्पर राहून कार्य करणे, प्रसंगी कठोरतेने अडचणी मधून मार्ग काढणे, हे काम एका सामान्य महिलेसाठी मुळीच सोपं नाही. यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो.
असे कर्तृत्ववान, धाडसी, प्रेमळ, बहुआयामी व्यक्तिमत्व, ज्यांच्या भेटण्याने मनात आदराची भावना निर्माण होते. माननीय भगत मॅडम यांच्या विषयी लिहायच झाल्यास महिला व बालकांच्या उद्धारकर्त्या म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
या सर्व अद्वितीय कार्याची दखल राज्यस्तरावर घेत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मॅडमचा गौरव करण्यात आला आहे.
पुन्हा एकदा आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दीक शुभेच्छा....
निडर धाडसी
लेक साहसी
रणशिंग फुंकले
धैर्याने......
दाखवी विरता
ठासवी शौर्यता
संघर्ष वेचले
त्यागाने.....
लहरतो झेंडा
फडकतो पताका
विजयाचे पाऊल
वेगाने........
झुकती माना
ताठ कणा
शिकवण मिळते
कार्याने.......
घडे एकता
तेजस्वी क्षमता
कल्याण घडे
औदार्याने.....
चरणी तुमच्या
नतमस्तक होतो
स्वीकारा प्रणाम
आदराने....
शुभेच्छुक/शब्दांकन:- प्रफुल भोयर
7057586468
कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....
प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता ◆ कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...
-
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल भोयरच्या विश्वात्मक औदार्य चे विमोचन बळीराजा चेतना भवन येथे ग्राहक दिन साजरा ग्राहकाला केंद्रस्थ...
-
यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव... रक्तदानाच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी दिला पहिला सामाजिक पुरस्कार यवतमाळ जिल्हा साहित्य...