28 August 2021

क्षण

            ◆ क्षण ◆

माणुसकीच्या वाटा सोडून 

चालू नको कधीही

त्या पथावर फक्त 

काटेच पेरलेले दिसेल।।


बंधन झुगारून तू

नवी नाती जोड

मन जरी सांगेन पण

रक्त विसरू नकोस।।


चार बुक बनवेन तुला

जगात सामर्थ्यवान 

सद्भावना सोडून कधी

अनिष्ठेने बघू नकोस।।


समोर दिसला जरी

होताना कुठे अन्याय

लाचार होऊन हात

बांधून राहू नकोस।।


जगणं समृद्ध कर

रडत बसू नको

वेळ एकदाच येते

क्षण सोडू नको।।

        ✍🏻- प्रफुल्ल भोयर ( मुकुटबन )



23 August 2021

वाढदिवस साजरा करण्याची अनोखी पद्धत....

रक्तदान करून साजरा केला वाढदिवस....

          आजचा युवक स्वतःपेक्षा जास्त समाजासाठी काहीतरी करण्याच्या धडपडीत असतो, आपल्या हातून देशसेवा घडावी यासाठी प्रयत्नरत असतो. त्यासाठी ते संधीच्या शोधात असतात. वाढदिवस योग्य संधी असल्याचं जाणून यवतमाळ येथील अक्षय व्यवहारे यांनी अभिषेक ठाकूर आणि प्रफुल भोयर यांच्या सहकार्यातून रक्तदानाने वाढदिवस साजरा केला.

           रक्तदान म्हटलं की अशक्तपणा येते म्हणून अनेक जण पाठ फिरवतात. रक्तदानासाठी अनेकांचा स्पष्ट नकार असतो अपवाद म्हणून अक्षय व्यवहारे यांनी आनंदाला द्विगुणित केले तेही स्वैच्छिक रक्तदानाने. यावेळी त्यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.





18 August 2021

मांगली येथे आयोजित रक्तदान शिबिरात ४१ जणांनी केले रक्तदान....!!!

 मांगली येथे आयोजित #रक्तदान शिबिरात

      ४१ जणांनी केले रक्तदान....!!!
रक्तसंकलन :- श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रक्तपेढी यवतमाळ

🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻
















14 August 2021

घडविली रक्तवीर ने महान सेवा...

घडविली रक्तवीर ने महान सेवा
 ◆ महाराष्ट्राच्या युवकाची अनोखी चळवळ
          
          विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आज कुणाला कुणासाठी वेळ नाहीच. जो तो आपापल्या कार्यात मग्न आहे. स्वार्थासाठी ओळ्खणाऱ्यांची संख्या तर ढीगभर दिसते. त्यात आपल काम झाल्यावर विसरून जातात. पण रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कुणाची ओळख नसताना, कुणाचं नाव माहीत नसताना आणि कुठलीच अपक्षा न करता मदतीसाठी तयार होतात.
          आज मुकुटबन येथील रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचे एक मोठया वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत तरुणांना जगणं शिकवून जाते आणि समाजात प्रेरणा म्हणून रक्तवीर कायम उरते.
आपल्या संस्थेतर्फे या तरुणांनी महाराष्ट्रात रक्तदानाची एक चळवळ राबविली. याच यशस्वरूप अर्थातच ती यशस्वी ठरली. बऱ्याच वर्षापासून करत येत असलेल्या रुग्ण सेवेमुळे या संस्थेच्या हातून महान सेवा घडली आहे. ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. रक्तवीर ने सुरुवातीपासूनच रक्तदाते देण्याचा विक्रम केला आहे. संपूर्ण भारतभर रक्तविरची व्याप्ती आहे.   हजारो रक्तदाते देऊन ते गरजू रुग्ण जीव वाचविण्यात अग्रेसर आहे. यामध्ये प्रामुख्याने सहकार्य करणारे गणेश मुद्दमवार, प्रफुल भोयर, प्रियल पथाडे, जयपाल उत्तमानी, अभिषेक ठाकूर, स्वप्नील अलगदिवे,सागर इलकर, राहुल कुरझडकर, चैतन्य तेलरांधे, शुभम निपाने, यशवंत गिरी, सुनिल नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे, भुषण फरांडे हे आहेत. 
           यावेळी यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतातील सर्व रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे.





 

दैनिक दिव्य मराठी & अनिकेत दादा आपले अनेक आभार!

 दैनिक दिव्य मराठी & अनिकेत दादा  आपले अनेक आभार!



        दिव्य मराठी (यवतमाळ) च्या मुख्य पानावर मी काढलेल्या छायाचित्राला जागा दिली. निसर्गाची दिव्यता आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या झरीच्या भीमनाळा तलावाच्या चित्रांमुळे आपण विपुल वनसंपदेचे धनी असल्याचं  लक्षात येते.

या चित्राला वृत्तपत्रात मुख्य ठिकाणी स्थान देऊन आपण झरी तालुक्याचा गौरवच केला आहे.


झाडाफुलांनी नटली

सृष्टी सौंदर्याचं लेणं।।

हे कुबेरा दारीच

दिव्य निसर्गाचं देणं।।

          ✍🏻- प्रफुल्ल भोयर

📰📰🙏🏻🙏🏻🌱🌱🌎🌎🌿

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳





07 August 2021

रक्तवीर ची महान सेवा....

 रक्ताची गरज पूर्ण करते

वेळेवर मदतीसाठी धावते

मनाच्या आधारासोबत 

अश्रू हाताने पुसते ती.....रक्तवीर!


रक्तवीर ची महान सेवा...



रक्त देने म्हणजे आजही अनेक युवकांच्या मनावर भार वाटतो.

मनाच्या आत्मप्रेरणेेशिवाय मनास रक्तदानासाठी तयार करणे, फार कठीण काम आहे. ते कठीण काम करताना अनेक तरुण दिसत आहे. रक्तदाता अमित मोकाशे यांनी आज रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. ज्यांच्या शरीरातील ब्लड पेशींची संख्या कमी झाली होती. रक्तदाता मिळत नव्हता. अशा कठीण वेळी त्यांच्यासाठी रक्तदान करून अमित दादा यांनी मानवता जपली. श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तपेढीत जाऊन  रक्तदान केलं. मोनेश्वर खंडरे यांच्या प्रेरणेतून आज जीव वाचविण्याचं भाग्य अमितदादांना लाभलं. यामध्ये प्रफुल भोयर यांचे विशेष सहकार्य मिळाले.

06 August 2021


 झरी तालुक्यातील भिमनाळा तलावाचे मनमोहक दृष्य...

               छायाचित्र :- प्रफुल भोयर ( मुकुटबन )



कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...