28 April 2021

सख्या भावंडांनी केलं स्वैच्छिक रक्तदान...!

◆सख्या भावंडांनी केलं स्वैच्छिक रक्तदान...!


          संपुर्ण देश कोरोनाशी लढा देत आहे. लॉकडाऊन मुळे रुग्णांना रक्ताची अडचण भासत आहे. आपला छोटासा प्रयत्न एखाद्याला जीवनदान देऊ शकतो, या विचाराने तुम्ही रक्तदानाचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्यासाठी जिगर लागते. आम्ही रक्तदानासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शंतनू आणि ऋषीकेश देशमुख या सख्या भावंडांनी रक्तदानाचा निर्णय घेतला आणि बालाजी रक्तपेढी अमरावती येथे रक्तदान केलं.
          1 मे रोजी सुरू होणाऱ्या लसीकरणा आधी रक्तदान करण्याचे आवाहन सर्वत्र होत आहे, आवाहनाला प्रतिसाद म्हणून घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. दादा तुम्ही स्वखुशीने व विनामोबदला रक्तदान करून खरीखुरी ईश्वरसेवा केली. यामुळे गरजु रुग्णाचे जीव वाचतील..
        तुम्ही नेहमीच करत येत असलेलं #रक्तदान समाजाला दिलेली रक्तदान विषयी चळवळीची प्रेरणा आहे.
आपल्या या रक्तदाना बदल आपले मनस्वी आभार व खुप खुप धन्यवाद....


#PrafulBhoyar
#Bravery_Raktveer ♥️
7057586468

20 April 2021

रक्तवीरच्या रक्तदान चळवळीने वाचवले असंख्य रुग्णांचे प्राण

रक्तवीरच्या रक्तदान चळवळीने वाचवले असंख्य रुग्णांचे प्राण

                


प्लाझ्मा दानासाठी राबवतोय - आत्मसन्मान मोहीम

          संपूर्ण जग कोरोना या जागतिक महामारीचा सामना करत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्या जात आहे. आज आपलं आरोग्य हिच सर्वोच्च प्राथमिकता झालेली आहे. कोविडच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी आपण धडपड करीत आहोत.

          अलीकडच्या काळात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज उपचारासाठी या रुग्णांना बेड मिळत नसल्याच बोललं जातं. गंभीर रुग्णांच्या आरोग्याची  निकडता लक्षात घेता  उपचारासाठी प्लाझ्मा वापरण्यात येत आहे. रुग्णसंख्या पाहता सर्वांना प्लाझ्मा मिळवून देणे शक्य नाही. पण प्रफुल्ल पर्यंत माहिती पोहोचल्यावर रक्ताची गरज पूर्ण झाली नाही, असे अद्याप झाले नाही. त्यामुळे प्रफुल्ल ची रक्तदान चळवळ ही विश्वसनीय आहे, हेही तेवढेच खरे.

           समाजातल्या गरजू रुग्णांना असलेल्या रक्ताची गरज लक्ष्यात घेऊन रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचा उगम झाला. छोटे छोटे लक्ष्य गाठत आज रक्तवीरने आपली मुळे भक्कम केली व रुग्णांना मोफत रक्त पुरवण्याच महान काम ती करत आहे. रक्तवीर प्रफुलच्या नेतृत्वाने निर्माण झालेल्या रक्तवीरांच्या साखळीने जीवनदात्यांचं रूप घेतलं आहे. रक्ताची गरज आहे म्हटल्यावर रक्ताचा पुरवठा करण्यासाठी आपला रक्तदाता तयार करतात व जीव वाचवण्याच मौलिक काम करतात.

          प्लाझ्मा मुळे कोविड रुग्ण बरा होत आहे हे माहीत झाल्यावर या रक्तवीरांनी रक्तदानाबरोबरच प्लाझ्मा दानाची जनजागृती करणे सुरू केले. अनेकांना प्लाझ्मा दानासाठी तयार करून गंभीर कोविड रुग्णांना मदत केली.

          महाराष्ट्रभर व्याप्ती असलेल्या रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेने आज कोविड रुग्णांसाठी "आत्मसन्मान मोहीम" हाती घेतली आहे. यामध्ये कोविड बरा होऊन 28 दिवस झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दानासाठी तयार करणे, ही प्राथमिकता आहे. आणि तुम्ही जे करत आहात ते मानवतेच्या दृष्टीने जीवनदान आहे, ही समजूत दिल्या जात आहे, अशी माहिती प्रफुल्ल भोयर यांनी दिली. गणेश मुद्दमवार, प्रियल पथाडे, निखिल धबडगे,सुनिल नलगंटीवार, गिरी,अभिषेक ठाकुर, चैतन्य तेलरांधे, सागर ईलकर, गोकुळ जुमनाके, राहुल कुरझडकर, मोनेश्वर खंडरे, विशाल जाधव, भुषण गिरी, हेमराज गिते, अजय गावंडे आणि प्रफुल्ल भोयर मोहिमेसाठी प्रयत्नशील आहेत.


दैनिक दिव्य मराठी 21/04/2021








03 April 2021

भूषण - नातं जोडणारा रक्तवीर🩸🇮🇳

 भूषण - नातं जोडणारा रक्तवीर🩸🇮🇳

        सातत्य नव्या उभारीने त्याच जोशाने टिकवून ठेवणे ही सर्वांची जमेची बाजू नाही. ज्यांना हे जमलं ते जीवनात यशस्वी ठरतात. रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचे भूषण गिरी यांच्या अविरत रक्तदानाने समाजात रक्ताचं नातं जोडणारा रक्तवीर म्हणून ते ओळखतात. दुसऱ्यांना आनंद देत जीवनाचे अनमोल क्षण जपण्यासाठी भूषण दादा नेहमी तत्पर असल्याचे नेहमीच पहावयाला मिळते. नागपूर येथे तातडीच्या रुग्णाला लवकरात लवकर ब्लड ची आवश्यकता असताना त्यांनी क्षणाचाही विचार न करता नागपूर शासकीय ब्लड बँकेत ब्लड डोनेशन केलं.

       जीव वाचवण्याच्या आलेल्या मानवतेच्या संधीच त्यांनी सोनं केलं.


"ईच्छा केली रक्तदानाची, संधी मिळाली मानवतेची"


प्रफुल भोयर ( यवतमाळ )

7057586468

02 April 2021

रक्तविर 🩸

रक्तविर - ज्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब मानवतेसाठी लढायला सांगतो, तो म्हणजे रक्तविर🩸

               ✍🏻 - प्रफुल्ल भोयर



कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...