सायबर सुरक्षा सप्ताह जनजागृती मोहीम
यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय यवतमाळ तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय यांचे मार्गदर्शनात, स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लाँ चे विद्यार्थी यांनी पोलीस कर्मचारी यांचे समवेत सायबर सुरक्षेचे महत्व नागरिकांना समजावे आणि सुरक्षा अबाधित रहावी यासाठी "सायबर सुरक्षा सप्ताह" जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात स्टेट बँक चौक यवतमाळ येथे होऊन शहरातील विविध मुख्य चौकात सायबर सेल व विद्यार्थी याचे मार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
या दरम्यान नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात येवुन ऑनलाईन फसवणूक संबधी जाणीवजागृतीसाठी संबंधित मजकुराची पत्रके लोकांमध्ये वाटण्यात आली आहे.
प्रत्येकाच्या हातात आहे
मोबाईल महत्वपूर्ण कडी
वैचारिकतेने मीडिया वापरा
टाळा फसवणुकीचा बळी ।।