14 June 2024

अविरत चालणारी "आकल्प आयुष्य व्हावे" मोहीम ठरतेय यशस्वी🩸

 अविरत चालणारी "आकल्प आयुष्य व्हावे" मोहीम ठरतेय यशस्वी🩸

डॉ. पंकज आशिया साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे हस्ते रक्तदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

🇮🇳🙏🏻🌱



अविरत रक्तदान जनजागृती मोहिमेच्या निमित्ताने........


          आपल्या जीवनाचा अमूल्य क्षण ज्यांनी सेवेत वाहिला आणि अविरतपणे समाजासाठी काहीतरी करण्याचा मानस ठेवतात, त्या सर्वांचे आभार.


     आयुष्याचे सुंदर क्षण अनुभवण्याचा अधिकार सर्वाना आहे. ते अनुभवताना  मानवतेची मूल्ये सांभाळली जावीत. सद् विचाराची कास सोडता काम नये. आपलं मन करुणेचा सागर आहे, त्यात सदैव आपुलकीची भावना राहते. त्याच भावनेतून मदतीचा एक हात देता यावा.


     "आयुष्य सकळां मिळो" हा आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी धुरंधर दाता तयार होऊन मानवतेची जागृती व्हावी, एवढाच मोहिमे मागील उद्देश.


          रक्तातील प्लाझ्मा हा शरीरातील रक्ताचा सर्वात अष्टपैलू घटक होय. संवेदना चेतवणारा घटक म्हणजे रक्त. त्यामुळे प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. प्रत्येक देणगी महत्त्वाची असते. तुम्ही काय करत आहात ही जाणीव आपल्याला खूप श्रीमंत बनवत असते. कारण जेव्हा तुम्ही रक्त देता तेव्हा तुम्ही अक्षरशः 'जीवनाची भेट' देत असता.


संयोजक

प्रफुल गणपत भोयर

लेखक - विश्वात्मक औदार्य


03 June 2024

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...